Vijay Wadettiwar : "देशद्रोही निकमांनी ही गोष्ट लपवली", वडेट्टीवारांच्या विधानाने मोठा वाद

मुंबई तक

Vijay Wadettiwar Ujjwal Nikam : हेमंत करकरे यांचा मृत्यू अजमल कसाबच्या बंदुकीतील गोळीने नव्हे, तर पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला होता, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केला.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Vijay Wadettiwar Ujjwal Nikam : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजबल कसाब, हेमंत करकरे यांच्या उल्लेख करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केले. त्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. वडेट्टीवार यांनी निकम यांना देशद्रोही म्हटले आहे. (Vijay Vadettiwar has criticized that Ujjwal Nikam is a traitor)

विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "काही प्रश्न जे आहेत की, ज्या उज्ज्वल निकमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. ती हकिकत नव्हती कसाबला बिर्याणी दिल्याची. कसाबला कुणी बिर्याणी देईल का? उज्ज्वल निकमने ते नंतर मान्यही केलं. असा बेईमान माणूस आहे तो. हा कसला वकील. हा देशद्रोही आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा >> अजित पवारांनी मिशा काढायची तयारी ठेवावी -श्रीनिवास पवार 

"यांनी जे मांडले, ते पुरावे द्यायला पाहिजे होते. ज्यावेळी आमच्या हेमंत करकरेंचा खून झाला. ती गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कुठल्या अतिरेक्याचीही नव्हती. ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्याची होती, आरएसएस समर्पित. 

त्यावेळी हे पुरावे लपवले. हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल, तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर तिकीट भाजप देत असेल,तर मात्र, हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का? हा प्रश्न येतो. 

    follow whatsapp