'तुझसे नाराज नही जिंदगी..' गाणं म्हणत न्यूज अँकरचा घोटला गळा; मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी रस्त्याचा एक्सरे काढला

मुंबई तक

Crime News : पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका न्यूज अँकरच्या हत्येचं गुपित शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.  18 वर्षीय प्रतिभावान न्यूज अँकर सलमा सुल्ताना हिची 21 ऑक्टोबर 2018 रोजी तिच्या प्रियकरानेच हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार कोमल हिने सोमवारी न्यायालयात दिलेली साक्ष अत्यंत भयानक आहे. कोमलच्या सांगण्यानुसार, आरोपी मधुर साहू हा एका हाताने सिगरेट ओढत आणि दुसऱ्या हाताने सलमाचा गळा घोटत होता. विशेष म्हणजे, ज्यावेळी सलमा मृत्यूशी झुंज देत होती, त्यावेळी तो तिचेच आवडते गाणे 'तुझसे नाराज नहीं जिंदगी...' मोठ्याने गात होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तुझसे नाराज नही जिंदगी..' गाणं म्हणत न्यूज अँकरचा घोटला गळा

point

मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी रस्त्याचा एक्सरे काढला

Crime News : पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका न्यूज अँकरच्या हत्येचं गुपित शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.  18 वर्षीय प्रतिभावान न्यूज अँकर सलमा सुल्ताना हिची 21 ऑक्टोबर 2018 रोजी तिच्या प्रियकरानेच हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार कोमल हिने सोमवारी न्यायालयात दिलेली साक्ष अत्यंत भयानक आहे. कोमलच्या सांगण्यानुसार, आरोपी मधुर साहू हा एका हाताने सिगरेट ओढत आणि दुसऱ्या हाताने सलमाचा गळा घोटत होता. विशेष म्हणजे, ज्यावेळी सलमा मृत्यूशी झुंज देत होती, त्यावेळी तो तिचेच आवडते गाणे 'तुझसे नाराज नहीं जिंदगी...' मोठ्याने गात होता.

हे ही वाचा : मुंबई : तरुणी रेल्वे स्टेशनच्या शौचालयात गेली, नंतर बराच वेळ बाहेरच येईना; दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार समोर

16 व्या वर्षी पत्रकारितेच्या जगात पाऊल

सलमा सुल्ताना ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी होती, जिने अवघ्या 16 व्या वर्षी पत्रकारितेच्या जगात पाऊल ठेवले होते. कोरबा येथील एका स्थानिक चॅनेलमध्ये अँकर म्हणून काम करताना तिने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न पाहणारी सलमा 21 ऑक्टोबर 2018 रोजी कामासाठी घरातून बाहेर पडली ती कायमचीच. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बराच शोध घेतला, मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही. सुमारे दोन महिन्यांनंतर जानेवारी २०१९ मध्ये कुसमुंडा पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली, परंतु सुरुवातीच्या काळात पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही.

जमिनीचा एक्सरे काढला

या हत्येचा खुलासा पाच वर्षांनंतर झाला तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. सलमाची हत्या करुन तिचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात आला होता, तिथे आता चक्क नॅशनल हायवे बांधण्यात आला होता. पोलिसांना मृतदेहाचा सुगावा लागल्यानंतर हायवे खोदण्याची वेळ आली होती. या मोहिमेत पोलिसांना वैज्ञानिकांची मदत घ्यावी लागली आणि जमिनीचा एक्स रे काढून सांगाड्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच वर्षे उलटून गेल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे आरोपीचे नियोजन अत्यंत प्रभावी ठरले होते, मात्र साक्षीदाराच्या जबानीने हे रहस्य उघड केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp