Sumitra Mahajan : "लोक फोन करून सांगताहेत की, भाजपला नाही 'नोटा'ला मत देणार"
Sumitra Mahajan : भाजपच्या नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अक्षय कांती बम यांच्या भाजप प्रवेशावरून गंभीर विधान केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंदूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक
सुमित्रा महाजन यांचं मोठं विधान
अक्षय कांती बम यांचा भाजप प्रवेशावर व्यक्त केली नाराजी
Sumitra Mahajan on Indore Lok Sabha : इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात आता पक्षाचा उमदेवार नाही. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. दरम्यान, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या राजकीय घटनेबद्दल नाराजी व्यक्त करताना मोठं विधान केले आहे. त्यामुळे भाजपबद्दल नाराजी असल्याचे समोर आलं आहे. (Sumitra Mahajan said that people are saying that they will vote for NOTA and not to BJP)
काँग्रेसने अक्षय कांती बम यांना उमेदवारी दिली होती. पण, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमदेवारी मागे घेतली. यावरून भाजपवर टीका होत आहे. याबद्दल लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुमित्रा महाजन नेमकं काय बोलल्या?
'एमपी Tak'ला सुमित्रा महाजन यांनी मुलाखत दिली. इंदूरमध्ये भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा अंदाज होता. पण, जो घटनाक्रम घडला... त्यावर राहुल गांधीही असे म्हणाले की, ताईंच्या शहरात हे घडलं. यावर तुम्ही काय विचार करता? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्याला उत्तर देताना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, "खरंतर मी सुद्धा विचारात पडले की, हे का झाले आणि कसे झाले? हे माझ्याही समजण्या पलिकडे आहे. पहिली गोष्ट अशी की, मी संघटनेच्या कोणत्याही समितीमध्ये नाहीये. मी निवृत्त झालीये, पण काम करते. पण, कोणत्याही पदावर नाही."










