DC vs MI दुसऱ्यांदा भिडणार, पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या संघातील लढत रंजक ठरणार?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

DC vs MI मधील सामन्यात कोण मारणार बाजी?

point

ऋषभ पंतच्या नावाचा सगळीकडे बोलबाला

point

दिल्ली-मुंबई संघाचे संभाव्य प्लेइंग-11

IPL 2024 : MI vs DC : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 43व्या सामन्यात आज (27 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्स (MI) सोबत होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आठपैकी चार सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आठपैकी तीन सामने जिंकले आहेत. हा सामना आज दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. (IPL 2024 DC vs MI match 43 predicted playing 11 both teams of rishabh pant hardik pandya)

ADVERTISEMENT

या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 वरही चाहत्यांची नजर असेल. दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होण्याची शक्यता दिसत नाही. डेव्हिड वॉर्नर आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे या सामन्यासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रोमॅरियो शेफर्ड मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये परत येऊ शकतो. शेफर्ड गेल्या सामन्यातून बाहेर पडला आणि नुवान तुषाराला संधी मिळाली.

DC vs MI मधील सामन्यात कोण मारणार बाजी?

आयपीएल 2024 च्या या सीझनमध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. याआधी 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये मुंबईने 29 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत मुंबई इंडियन्सने 19 सामने जिंकले आणि दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'आरशात पाहिलं की लायकी कळेल', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार!

दिल्ली कॅपिटल्सने सध्याच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली. काही सामन्यांमध्ये त्यांनी तुफानी खेळी खेळत जबरदस्त विजय नोंदवला तर काही सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीने गेल्या चारपैकी तीन सामने जिंकले असून मुंबईचा पराभव केल्यास प्लेऑफमधील त्यांचा संघ थोडा मजबूत होईल. दुसरीकडे, खराब सुरुवातीनंतर मुंबईने पुढील चारपैकी तीन सामने जिंकले, परंतु शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सकडून नऊ विकेटने हरला.

ऋषभ पंतच्या नावाचा सगळीकडे बोलबाला

दिल्लीसाठी सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे कर्णधार ऋषभ पंतची जबरदस्त खेळी. तो सध्या फॉर्ममध्ये आहे. बुधवारी (24 एप्रिल) गुजरात टायटन्स (GT) विरुद्धचा सामना जिंकून त्याने नाबाद खेळी खेळली. संजू सॅमसन, दिनेश कार्तिक आणि इशान किशन यांच्याकडून कठीण स्पर्धा असूनही, टी-20 विश्वचषक संघातील त्याचे स्थान निश्चित दिसते.

ADVERTISEMENT

हेही वाचा : वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने नाराज, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक पदाचा तडकाफडकी राजीनामा

दिल्लीला जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या रूपात एक उत्तम फलंदाजही मिळाला आहे, पण सलामीवीर पृथ्वी शॉकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी खेळलेला शाई होप काही अप्रतिम खेळी खेळू शकला नाही. ट्रिस्टन स्टब्स प्रभावी ठरला आहे, तर गुजरातविरुद्ध फलंदाजीत आलेल्या अक्षर पटेलनेही चमकदार कामगिरी केली आहे.

चायनामन कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी अप्रतिम फिरकी गोलंदाजी दाखवली असली तरी दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने जवळपास 14 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. खलील अहमद, मुकेश कुमार आणि इशांत शर्मा हे प्रभावी ठरलेले नाहीत.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Nanded: कुऱ्हाडीने EVM फोडलं, मतदान केंद्रात भयंकर घटना...नेमकं काय घडलं?

मुंबई इंडियन्ससाठी, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर टीम डेव्हिड, इशान किशन आणि हार्दिक यांना मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराह हा गोलंदाजीतील ट्रम्प कार्ड आहे ज्याने सुमारे सहाच्या सरासरीने 13 बळी घेतले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या जेराल्ड कोएत्झीने 10.10 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग-11

  • शाई होप, पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.
  • इम्पॅक्ट प्लेयर- रसिक सलाम दार

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग-11

  • ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, रोमॅरियो शेफर्ड, जसप्रीत बुमराह.
  • इम्पॅक्ट प्लेअर: पियुष चावला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT