लग्नाची बोलणी सुरु होती, गर्लफ्रेंडचे दोन भाऊ आले अन् ब्लेडने बॉयफ्रेंडचा गळा चिरला; नेमकं कारण काय?

मुंबई तक

Crime News : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका 25 वर्षीय तरुणावर त्याच्या प्रेयसीच्या दोन लहान भावांनी जीवघेणा हल्ला केला. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्जिकल ब्लेडने आरोपींनी तरुणाचा गळा चिरला. महेंद्र कनोजिया असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील ही घटना आहे. सुदैवाने कुटुंबियांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महेंद्रचे प्राण वाचले असून त्याच्या गळ्यावर 18 टाके पडले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाची बोलणी सुरु होती, गर्लफ्रेंडचे दोन भाऊ आले अन् ब्लेडने बॉयफ्रेंडचा गळा चिरला

point

नेमकं कारण काय?

Crime News : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका 25 वर्षीय तरुणावर त्याच्या प्रेयसीच्या दोन लहान भावांनी जीवघेणा हल्ला केला. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्जिकल ब्लेडने आरोपींनी तरुणाचा गळा चिरला. महेंद्र कनोजिया असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील ही घटना आहे. सुदैवाने कुटुंबियांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महेंद्रचे प्राण वाचले असून त्याच्या गळ्यावर 18 टाके पडले आहेत.

हे ही वाचा : नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली

लग्नाच्या चर्चेदरम्यान हल्ला

महेंद्र कनोजिया हा व्यवसायाने शटरिंगचे काम करतो. त्याचे 27 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. महेंद्रच्या कुटुंबीयांनी लग्नाची चर्चा करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या तरुणीला आपल्या घरी बोलावले होते. चर्चा सुरु असतानाच तरुणीचे दोन लहान भाऊ शिवम गौतम आणि अनुराग गौतम अचानक तिथे पोहोचले. त्यांनी अचानक महेंद्रवर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी महेंद्रला जमिनीवर पाडले आणि सर्जिकल ब्लेडने त्याच्या गळ्यावर वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घरात एकच खळबळ उडाली.

प्रसंगावधानामुळे जीव वाचला

महेंद्रचे वडील संतोष आणि काका रमेश यांनी जीवाची पर्वा न करता दोन्ही हल्लेखोरांना पकडले आणि त्यांच्या हातातील ब्लेड हिसकावून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत महेंद्र बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याच्या जखमेवर 18 टाके घातले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. महेंद्रच्या मोठ्या भावाच्या सासरच्या गावातून या प्रेमसंबंधांची सुरुवात झाली होती, मात्र मुलीच्या कुटुंबाचा या नात्याला तीव्र विरोध होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp