बीड: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद; थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...

मुंबई तक

तालुक्यातील रूईनालकोलमध्ये सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी, स्टेटस टाकण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

ADVERTISEMENT

एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद
एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद

point

थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...

point

बीडमधील धक्कादायक घटना

बीड - रोहिदास हातागळे: बीडच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील रूईनालकोलमध्ये सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी, स्टेटस टाकण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या भयानक हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार

संबंधित घटना ही रूईनालकोल येथे सोमवारी (16 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक शिवाजी नालकोल (20 वर्षे) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला असून जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: 2 मुलांच्या आईवर तरुणाचं एकतर्फी प्रेम... शेवटी, वैतागलेल्या महिलेने आई-वडिलांसोबत मिळून काढला काटा!

एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर ही भयानक घटना घडली असून सोमवारी तरूणांच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काही वेळातच, हा वाद टोकाला पोहोचला आणि वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीररित्या जखमी झाले. 

हे ही वाचा: महिलेच्या वेशात आत शिरला अन् तरुणाने आपल्याच मेहुणीचा गळा चिरला... नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिली माहिती 

जखमी झालेल्या तरूणांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक नालकोल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर इतर 2 जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, याच्यासह अंमलदारांनी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp