Pune Mumbai Expressway मार्गावर दोन तास वाहतूक राहणार बंद, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune Mumbai Expressway Traffic latest News : landslide Traffic restored on both lanes of express way.
Pune Mumbai Expressway Traffic latest News : landslide Traffic restored on both lanes of express way.
social share
google news

Pune Mumbai Expressway Traffic : वाहनांची मोठी रहदारी असलेल्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर रविवारी (23 जुलै) रात्री 10.35 वाजता दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. दरडीचा मलबा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर कोसळला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने काम हाती घेतले. सोमवारी (24 जुलै) सकाळपर्यंत हा मलबा हटवण्यात आला. (Pune Mumbai Expressway Traffic restored. Traffic on both lanes was halted for nearly 2 hours.)

ADVERTISEMENT

मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी गावाच्या हद्दीत बोगद्याजवळ दरड कोसळली. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा मुंबईच्या तिन्ही लेनवर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाचा >> पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

रात्रीच आरआरबीचे जेसीबी, डंपरच्या सहाय्याने महामार्गावरील दरडीचा ढिगारा बाजूला करण्यात आला. या कामासाठी आरआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी होते. या दरड दुर्घटनेमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती.

हे वाचलं का?

वाचा >> Lok Sabha 2024 : सत्तेच्या ‘हॅटट्रिक’साठी खास स्ट्रेटजी! 338 खासदारांच्या 10 टीम, मोदी बघणार रिपोर्ट

सोमवारी सकाळपर्यंत प्रशासनाने मातीचा ढिगारा महामार्गावरून काढून तिसऱ्या व शोल्डर लेनच्या बाजूला काढून ठेवण्यात आला. चार जेसीबी, 4 डंपरच्या मदतीने हे कार्य करण्यात आलं. मातीचा ढिगारा हटवण्यात आल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तास वाहतूक राहणार बंद

पुणे– मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री दरड कोसळल्याने साडेचार तास मुंबईच्या दिशेने वाहतूक ठप्प होती. दरम्यान, आज डोंगरावरील सैल झालेली दरड काढण्यासाठी बारा ते दोन या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तेव्हा, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून ही वाहतूक वळवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT