Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले ‘भड@#’, भिडे बरळले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

what is sambhaji bhide controversial statement on mahatma phule, mahatma gandhi, sai baba?
what is sambhaji bhide controversial statement on mahatma phule, mahatma gandhi, sai baba?
social share
google news

Sambhaji Bhide Controversy statement : शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी महापुरुषांबद्दल बोलताना पुन्हा एकदा गरळ ओकली. अमरावतीत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ आता समोर आले असून, यात संभाजी भिडे हे लोकहितवादी, महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. तर साईबाबांना शिवीगाळ करत आहेत. (Sambhaji Bhide Controversial Statement on Mahatma Phule)

अमरावतीत संभाजी भिडेंचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधी आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल केलेल्या विधानामुळे भिडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच आता या भाषणातील पुढचा भाग समोर आला आहे. यात संभाजी भिडे महात्मा फुले, लोकहितवादी यांच्यासह साईबाबांनाही शिवीगाळ करत आहेत.

संभाजी भिडे त्या भाषणात काय बोलले?

या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणतात, “सूर्य मावळू शकत नाही, असं साम्राज्य आहे. गोळ्या घाल. उठाव कर. सशस्त्र उठाव याच्याने होणार नाही. इंग्रजांच्याकडून राज्य कसं मिळवायचं याचं शिक्षण घेतलं पाहिजे. असं बोलणारी कुत्री इथं या देशात, सुधारक नावाची जात एक उत्पन्न केली आणि सुपरगां#@, या भड@#ना सुधारक नावाच्या पदव्या देऊन या देशात तुमचेच सोयरी तुमच्यावर सोडले. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय… पूर्ण देशाचा घात करणारा नालायक मनुष्य होता.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

महात्मा फुलेंबद्दल संभाजी भिडेंनी काय बडबडले?

भाषणात संभाजी भिडेंनी महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दलही वादग्रस्त विधान केले. “महाराष्ट्रात लोकहितवादी, महात्मा फुले हे नाव घेतल्यावर तुमच्या अंगाला झोंबलं असेल, सगळे सगळे 2 तास सांगू शकतो. प्रत्येकाच्या ढुं@#$ वर देशद्रोहाचे काय काय शिक्के आहेत ते”‘, असे अकलेचे तारे भिडेंनी तोडले.

वाचा >> Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार

साईबाबांना शिव्या, भिडेंचे संतुलन बिघडलं?

“हिंदू समाज साईबाबाला पुजतो. तो साईबाबा काय लायकीचा भ@#वा आहे, एकदा पाहा तुम्ही. मी काय बोलतोय, जागा आहे बरं का… मी काय टकूरं सरकलेला माणूस नाहीये. हराम@#$ साईबाबा देवाच्या सिंहासनावर जाऊन बसलाय”, अशा अर्वाच्य भाषेत संभाजी भिडेंनी साईबाबांवर टीका केलीये. त्यामुळे भिडेंवर विरोधकांकडून चांगली टीका होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT