स्वरसरस्वती हरपली… ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंचं निधन!
संगीत क्षेत्राशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे आज शनिवारी (13 जानेवारी) पहाटे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
Prabha Atre Passes Away : संगीत क्षेत्राशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे आज शनिवारी (13 जानेवारी) पहाटे निधन (Death News) झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांचे निधन झाले. (Senior classical singer Dr. Prabha Atre Passes Away Death News)
ADVERTISEMENT
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुंबईत एक कार्यक्रमही होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
वाचा : राऊतांचा PM मोदींना टोला, ‘लादीवर रेड कार्पेट टाकूनही सफाई दर्शन…’
गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती. यंदाही त्या गाणार होत्या. मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नव्हत्या. शास्त्रीय संगीताचा वारसा जपलेल्या महान गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्रे यांनी अनेक शिष्ये घडवली आहेत.
हे वाचलं का?
प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांना 1990 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2022 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. पुण्यातील एका शाळेत त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. त्याच शाळेत प्रभा यांनी शिक्षण घेतलं.
वाचा : Beed Accident : ट्रकला धडकून पिकअपचा चक्काचूर, बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू
गाण्याच्या छंदातून प्रभा यांना संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली. ही आवड जोपासत त्यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. यासोबतच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान क्षेत्रातून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर लॉ कॉलेजमधून त्यांनी स्नातक पदवी मिळवली. प्रभा अत्रे सूर संगम सारख्या संकल्पनांवर आधारित मैफलींसाठी प्रसिद्ध आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT