काळीज पिळवटून टाकणारी घटना, ‘यामुळे’ मजुराने केली गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

tired of unemployment a laborer in hingoli district committed suicide
tired of unemployment a laborer in hingoli district committed suicide
social share
google news

ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली

हिंगोली: एकीकडे गगनाला भिडलेली महागाई तर दुसरीकडे वाढती बेरोजगारी.. यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा याच विवंचनेतून कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातील कोंढूर येथील विठ्ठल गुलाबराव पतंगे (वय 40 वर्ष) या मजुराने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (tired of unemployment a laborer in hingoli district committed suicide)

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल गुलाबराव पतंगे आणि त्यांची पत्नी शेतात सालगडी म्हणून काम करायचे. मात्र, अचानक हातचं काम सुटलं. त्यातच दुसरीकडे काम शोधूनही मजुरी काही मिळत नव्हती. अशावेळी आता पोट कसं भरायचं आणि दोन मुलांची शिक्षणं कशी करायची? हा प्रश्न विठ्ठल पतंगे यांना पडला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला रंगेहाथ अटक

गेले अनेक दिवस ते याच विचाराने निराश झाले होते. दरम्यान, 24 एप्रिल (सोमवार) रोजी आपण शेतात कामानिमित्त जातो. असं विठ्ठल पतंगे हे घराबाहेर पडले. पण त्यानंतर विठ्ठल पतंगे हे घरी परतलेच नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास शेतात काही शेतकऱ्यांनी मजूर विठ्ठल पतंगे यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उप निरीक्षक शिवाजी बोडले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मायाताचा भाऊ गजानन गुलाबराव पतंगे यांच्या फिर्यादिनुसार बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> खळबळजनक… पुण्यात प्रेयसीच्या बाळाची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या, कारण…

बेरोजगारीमध्ये वाढ

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील बेरोजगारीमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ज्याचे गंभीर परिणाम आता पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात देखील एका तरुणाने हाताला काम नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता हिंगोलीतही तशीच घटना घडली आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार काही ठोस पावलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT