खळबळजनक… पुण्यात प्रेयसीच्या बाळाची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

girlfriends baby was killed by drowning in boiling water in pune after girlfriend refused to have an immoral relationship
girlfriends baby was killed by drowning in boiling water in pune after girlfriend refused to have an immoral relationship
social share
google news

Pune Crime: पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यात प्रेयसीच्या सव्वा वर्षीय बाळाला प्रियकराने उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी चाकण पोलिसात प्रेयसीने प्रियकराच्या विरोधात तक्रार दिली आहे. 6 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. (girlfriends baby was killed by drowning in boiling water in pune after girlfriend refused to have an immoral relationship)

अनैतिक संबंधास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी विक्रम शरद कोळेकर याच्या विरोधात चाकण पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील कोयाळी येथे राहणारा विक्रम शरद कोळेकर हा शेलपिंपळगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी आला. दरम्यान प्रियकर आरोपी विक्रमने अवघ्या सव्वा वर्षीय बाळाला घेऊन बादलीत असलेल्या उकळत्या पाण्यात दोन्ही हात आणि पाय धरून बुडवले. यात बाळ गंभीर जखमी झाले. त्यावेळी बाळ मोठमोठ्याने रडतही होते. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना जन्मदात्या आईसमोरच घडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपी विक्रमने प्रेयसीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिचाही गळा आवळला तर बाळ का रडत आहे बघण्यासाठी आलेल्या प्रेयसीच्या बहिणीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तात्काळ बाळाला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, तिथे उपचार न होऊ शकल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान बाळाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला. याघटने प्रकरणी दोन दिवसांपूर्वी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी मोकाट असून त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

– प्रेयसी आणि आरोपी प्रियकर दोघेही विवाहित तरीही..

मृत्यू झालेल्या बाळाच्या आईचे आणि आरोपीचे सुरुवातीला प्रेमसंबंध होते. परंतु त्यानंतर तिचे लग्न झाल्याने ती विक्रम कोळेकरसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सातत्याने विरोध करत होती. पण याच रागातून त्याने बाळाला जीवे मारलं. असं तक्रारीत म्हटलं आहे. विक्रमचा विवाह झालेला असून त्यामुळे प्रेयसी विक्रमला टाळत होती. तू तुझ्या पत्नीसोबत रहा असं ती नेहमी सांगायची.

ADVERTISEMENT

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाचा विक्रमच्या प्रेयसीच्या आयुष्यच पूर्णपणे उध्वस्त झालं आहे. कारण आता तिने आपल्या बाळाला देखील गमावले आहे. तसेच तिचा पती देखील तिच्यापासून दुरावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT