Titan Submersible : टायटॅनिक बघायला जाणं ठरलं जीवघेणं, समुद्रात काय घडलं?
टायटॅनिक जहाजाचे अवशेष बघायला गेलेल्या टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाणबुडी चालवणारी ओशनगेटने याला दुजोरा देत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT
Titan Submersible Missing Latest News : टायटॅनिक जहाजाचे अवशेष बघायला गेलेल्या टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाणबुडी चालवणारी ओशनगेटने याला दुजोरा देत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते. नंतर त्यांचा संपर्क तुटला. 18 जून रोजी ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासांतच संपर्क तुटला होता. (What is the submarine that is missing?)
ADVERTISEMENT
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या माहितीनुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.
ओशनगेटच्या सीईओंसह प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू
टायटन पाणबुडीवर बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, प्रिन्स दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता.
हे वाचलं का?
18 जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली होती. टायटॅनिकची सांगाड्यापर्यंत जाणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे असा सुमारे आठ तासांचा हा प्रवास असतो.
हेही वाचा >> Patna : भाजपविरोधात फुंकणार रणशिंग, पण विरोधी पक्षांची ताकद किती?
टायटॅनिकच्या मलब्याजवळ जायला दोन तास लागतात. त्यानंतर चार तास पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष असलेला परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे दोन तास लागतात.
ADVERTISEMENT
शोध मोहिमेत आल्या खूप अडचणी
अचानक बेपत्ता झालेली ही पाणबुडी शोधणे सोपे नव्हते. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे एक अतिशय कठीण बचाव कार्य आहे. अहवालांवर विश्वास ठेवला, तर या शोध मोहिमेत शोध पथकाला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे पाण्यातील दृश्यमानता.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 2000 ची बॉडी बॅग 6800 ला! BMC कोविड सेंटर घोटाळा, ईडीच्या हाती स्फोटक माहिती
म्हणजे प्रकाश पाण्याच्या खाली फारसा जात नाही, तर पाणबुडी जवळपास 3 किलोमीटर खाली होती, अशा स्थितीत शोध पथकाला स्पष्ट दिसण्यात खूप त्रास होत होता.
पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच तुटला संपर्क
समुद्रात 12,500 फूट खोलीवर टायटॅनिकचे सांगाडा पाहण्यासाठी आणि परतण्यासाठी आठ तास लागतात. जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी टायटनच्या भंगारभोवती फिरते. त्यानंतर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. अशा स्थितीत टायटन 18 जून रोजी प्रवासाला निघाले, तेव्हा सुमारे दीड ते दोन तासांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. म्हणजेच ज्या वेळी पाणबुडीचा संपर्क तुटला, त्या वेळी ती ढिगाऱ्याजवळ पोहोचणार होती. मात्र त्यापूर्वीच ती रस्त्याच्या मधोमध अचानक बेपत्ता झाली.
हेही वाचा >> क्लासमेट, अफेअर आणि MPSC पास झाल्यावर दूर गेली… म्हणून राहुलने केली दर्शनाची हत्या!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपर्क तुटल्यानंतर सुमारे आठ तासांनी अमेरिकेच्या तटरक्षक दलाला अलर्ट मिळाला. अलर्ट मिळताच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली. यूएस कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की हे बचाव कार्य अतिशय गुंतागुंतीचे आहे.
ओशनगेटच्या मालकाच्या पत्नीने दोनदा बघितलंय टायटॅनिकचे अवशेष
पाणबुडी ओशनगेट कंपनीच्या मालक आणि पाणबुडीचे पायलट स्टॉकटन रश यांची पत्नी वेंडी यांचा टायटॅनिक जहाजाशी विशेष संबंध आहे. वेंडीचे पणजोबा इसिडोर आणि पणजी इडा स्ट्रॉस यांनी प्रथम श्रेणीतील प्रवासी म्हणून टायटॅनिक जहाजातून प्रवास केला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. वेंडीचा हा संबंध तिला दोनदा टायटॅनिकचे अवशेष बघायला घेऊन गेला. त्या स्वतःच्या पाणबुडीतून दोनदा या टूर वर गेलेल्या आहेत. 1986 मध्ये वेंडीचे स्टॉकटनशी लग्न झाले होते. स्टॉकटनने 2009 मध्ये ही कंपनी सुरू केली. वेंडी सध्या कंपनीच्या कम्युनिकेशन डायरेक्टर आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT