Maharashtra SSC Result 2025: 10 वीचा ऑनलाइन निकाल जाहीर, mahresult.nic.in वर पाहा तुमची मार्कशीट
Maharashtra SSC Result 2025/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावी 2025 ऑनलाइन निकाल (Maharashtra SSC result 2025) जाहीर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

10 वीचा ऑनलाइन निकाल जाहीर
Maharashtra SSC Result 2025/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावी 2025 ऑनलाइन निकाल (Maharashtra SSC result 2021) हा नुकताच जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बोर्डाने पत्रकार परिषद घेत संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा दहावीचा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. आता दहावीचा ऑनलाइन निकाल हा आज (13 मे) रोजी दुपारी 1 वाजेपासून जाहीर करण्यात आला आहे.
दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
'या' वेबसाइट्सवर पाहता येईल दहावीचा निकाल
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
विभागनिहाय निकाल
- कोकण – 99.82%
- कोल्हापूर – 96.78%
- मुंबई – 95.84%
- संभाजीनगर – 92.82%
- अमरावती – 92.95%
- पुणे – 94.81%
- नाशिक – 93.04%
- नागपूर – 90.78%
- लातूर – 92.77%
महाराष्ट्र दहावी निकाल 2025 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने SSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर.
SSC Result 2025 – नेमका निकाल कसा पाहाल?
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर केले आहेत.
- सगळ्यात आधी MSBSHSEच्या result.mh-ssc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
- होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2025 या लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
- यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाका.
- त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.
- उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M564213 असेल आणि तुमच्या आईचे नाव पल्लवी असं असेल तर तुम्ही M564213 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच PAL असं टाकावं लागेल.
- त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल आपल्यासमोर काही क्षणात दिसू लागेल.