CBSE 12th Result: CBSE 12 वीचा निकाल जाहीर, किती टक्के विद्यार्थी झाले पास? असा पाहा तुमचा निकाल
CBSE बोर्डाकडून 2025 वर्षातील 12 वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या 12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत 88.39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CBSE 12 वीचा निकाल जाहीर
CBSE 12 वी परीक्षेत किती टक्के विद्यार्थी झाले पास?
कुठे आणि कसा पाहाल निकाल?
CBSE Board 12th Result Date: CBSE बोर्डाकडून 2025 वर्षातील 12 वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या 12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत 88.39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in — या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता.
यावर्षी एकूण 44 लाखहून अधिक विद्यार्थांनी ही बोर्डाची परीक्षा दिली आहे. या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 18 मार्च पर्यंत सुरू होत्या, तसेच बारावी इयत्तेचा शेवटचा पेपर हा 4 एप्रिल रोजी घेण्यात आला होता.
'या' वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर आपली मार्कशीट cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट्सवर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थी आपलं डिजीटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र DigiLocker च्या माध्यमातून सुद्धा प्राप्त करू शकतात.
विद्यार्थ्यांना सोप्यारितीने निकाल तपासता यावा, यासाठी बोर्ड त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवून डिजीलॉकर लॉगिन आयडी आणि अॅक्सेस कोड शेअर करेल. यासोबतच, विद्यार्थी UMANG अॅप आणि SMS सेवेद्वारेही निकाल प्राप्त करू शकतात.










