उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळणार! राज्यात कसं आहे आजचं हवामान? जाणून घ्या

मुंबई तक

Maharashtra Weather Today : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट सुरु असून पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट सुरु असून पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत. दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मध्य महाराष्ट्र जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याच अंदाजही काल सोमवारी 12 मे रोजी बांधण्यात आला होता. अशातच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजचं हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कसं आहे आजचं हवामान?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, ताशी ५०-६० किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ताशी ४०-५० किमी वेगाने येण्याची शक्यता आहे.कोकण-गोवासह जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ताशी 30-40 किमी वेगाने येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >>  PM Modi Speech: 'पानी और खून एकसाथ नहीं बह सकते..' PM मोदींचं घणाघाती भाषण जसंच्या तसं...

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे,  पुणे घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये 30-40 किमी प्रति वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता काल सोमवारी वर्तवण्यात आली होती. 

कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये 50-60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाकडून सांगण्यात आली होती. 

हे ही वाचा >> Kirana Hills Nuclear Facility: 'भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ला केला?', एअर मार्शलांच्या उत्तराने...

हे वाचलं का?

    follow whatsapp