'केवळ मिसाइल सोडून काही होणार नाही, आता...', धीरेंद्र शास्त्री प्रचंड संतापले!
Bageshwar Dham Pandit : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी पाकिस्तानला बिघडलेलं लहान मुल असं म्हणत सुनावले आहे. एवढेच नाहीतर त्यांनी शस्त्रसंधीचेही उल्लंघन केल्याने त्यांनी पाकिस्तानला धारेवर धरले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याने धीरेंद्र शास्त्री प्रचंड संतापले.

निव्वळ मिसाईलने हल्ला करून चालणार नाही, पाकव्याप्त काश्मीर ताब्या घ्या.
Bageshwar Dham Pandit : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र पंडित शास्त्री यांनी भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने खडेबोल सुनावलं आहे. शस्त्रसंधीचा करार मोडणाऱ्या पाकिस्तानला पंडीत धीरेंद्र यांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. तसेच पाकिस्तानला बिघडलेलं लहान मुल म्हटलं आहे. त्यांनी कुत्र्याचं शेपूट वाकडंच असतं अशी मिश्कील टीका करत त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे.
हेही वाचा: PM Modi LIVE: Ceasefire कराराच्या 2 दिवसांनी PM मोदी देशाशी काय बोलणार? उरले अवघे काही तास...
नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री ?
जेव्हा धीरेंद्र पंडीत यांनी भारत पाकिस्तान देशांतील शस्त्रसंधीचा करार करण्यात आला त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून त्यांनी या पाकिस्तानवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही आणि प्रत्येक करारानंतर त्यांनी युद्धबंदीचे उल्लंघन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढे पाकव्याप्त काश्मीरवर भाष्य केलं.
पाकव्याप्त काश्मीरवर बोलताना ते म्हणाले की, भारतामध्ये पाकव्याप्त काश्मीर समाविष्ट करून घ्यावा, हिच ती वेळ आहे. पंतप्रधानांकडे आणि सैन्यांकडे याहून इतर चांगला वेळ नाही. भारताची पाकव्याप्त जमीन पुन्हा मिळवण्यासाठी ही वेळ आणि काळ महत्त्वाचा आहे. आपल्याला नुसते क्षेपणास्त्र हल्ला करून चालणार नाही. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताने ताब्यात आणलं जावं. हेच पाकिस्तानसाठी योग्य उत्तर आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांना ड्रोनद्वारे लक्ष्य केलं आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर शस्त्रहल्ला केला. पण पाकिस्तानचे सर्व हल्ले हे निष्फळ ठरले. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानला घुडघे टेकण्यासा भाग पाडले गेले. त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. यानंतर दोन्ही देशांनी सायंकाळी 5 वाजता हा करार लागू केला. मात्र, काही वेळानंतर पाकिस्तानने पुन्हा कराराचे उल्लंघन केलं.
ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरूच
भारताच्या भूमीवर दहशतवादाची पुनरावृत्ती झाली तर त्याचे रुपांतर हे युद्धात होईल, असे सरकारने आपले स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भारताने शस्त्रसंधीचा करार जारी केला आहे. पण ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरूच आहे. हा करार फक्त हल्ले थांबवण्यासाठी करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईला पुन्हा सुरूवात होऊ शकते.