SSC Result 2025 : 10 वीचा निकाल उद्या, रोल नंबर आताच करून ठेवा डाऊनलोड नाहीतर...
SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबाबबत मोठी अपडेट समोर आलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दहावीच्या निकालाची सर्वात मोठी अपडेट आली समोर
दहावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर
रोल नंबर कसा कराल डाऊनलोड? जाणून घ्या..
SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबाबबत मोठी अपडेट समोर आलीय. एसएससी म्हणजेच दहावीचा निकाल उद्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी घोषित केला जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर केला जाईल.
दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना या निकालाची प्रतिक्षा लागली होती. अशातच उद्या निकाल जाहीर केला जाणार असून अनेक विद्यार्थ्यांना रोल नंबर डाऊनलोडिंगचा प्रश्न पडला आहे. निकाल लागल्यानंतर रोल नंबर कसा डाऊनलोड करायचा, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना रोल नंबर डाऊनलोड करण्याची आवश्यकता लागणार आहे. रोल नंबर जाहीर केल्यानंतर ते कसं डाऊनलोड करायचे, याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mh-hsc.ac.in वर आवश्यक ती माहिती भरू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोल नंबर डाऊनलोड करता येऊ शकतो.
हे ही वाचा >> "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती
असा करा रोल नंबर डाऊनलोड
दहावीच्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mh-hsc.ac.in वर लॉन करा.
त्यानंतर आवश्यक ती माहिती वेबसाईटवर भरा.
तुमचं संपूर्ण नाव टाका. त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.
तुम्ही रोल नंबर स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर रोल नंबर डाऊनलोड करा.










