sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: दहावीचा निकाल जाहीर, 'या' 7 वेबसाईटवर झटपट पाहा तुमचा निकाल
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. 10 वी ) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आज दहावीचा निकाल जाहीर होणार
राज्यभरातील विद्यार्थी-पालकांचं निकालावर लक्ष
SSC Board Result 2025: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबाबबत एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो पालक आणि विद्यार्थी नजर लावून बसले आहेत. अखेर दहावीच्या परीक्षेचा हा निकाल आज (13 मे 2025) रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल हा 94.10% एवढा लागला. बोर्डाने पत्रकार परिषद घेत या निकालाबाबत घोषणा केली आहे. दरम्यान,दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल हा जाहीर केला जाईल. (ssc result 2025 maharashtra board 10th result date declared how to check know it)
दहावीचा विभागनिहाय निकाल
- कोकण – 99.82%
- कोल्हापूर – 96.78%
- मुंबई – 95.84%
- संभाजीनगर – 92.82%
- अमरावती – 92.95%
- पुणे – 94.81%
- नाशिक – 93.04%
- नागपूर – 90.78%
- लातूर – 92.77%
हे ही वाचा >> PM Modi Speech: 'पानी और खून एकसाथ नहीं बह सकते..' PM मोदींचं घणाघाती भाषण जसंच्या तसं...
विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल थेट पाहू शकतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती.
दहावीचा निकाल 'या' वेबसाइट्सवर पाहता येईल
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. 10 वी ) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. तसंच ही मार्कशीटची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.










