Viral : अरे बापरे! प्राण्यांप्रमाणे चार पायावर चालतात ‘ही’ माणसे, काय आहे रहस्य?
तुर्कीतल्या एका दुर्गम भागातली ही घटना आहे. या गावातील एक कुंटुंब दोन पायांऐवजी चार पायांवर चालते. प्राण्यांप्रमाणे या कुटुंबाला चालायची सवय आहे. या घटनेवर 2000 च्या दशकात एक वैज्ञानिक पेपर प्रकाशित झाला होता.
ADVERTISEMENT
जगभरात अशा अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत. ज्या गोष्टीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या गोष्टी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येत असतात. असंच एक कुटुंब आता जगासमोर आले आहे. जे प्राण्यांप्रमाणे चार पायांवर चालते.हे कुटुंब त्यांच्या दोन्ही हातांचा वापर पायाप्रमाणे करते. या कुटुंबाची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. आता नेमकं हे कुटुंब कुठे राहते. ते चार पायांवर का चालते? हे जाणून घ्या. (viral story family walk like animal four leg turkey scientist mystery)
ADVERTISEMENT
तुर्कीतल्या एका दुर्गम भागातली ही घटना आहे. या गावातील एक कुंटुंब दोन पायांऐवजी चार पायांवर चालते. प्राण्यांप्रमाणे या कुटुंबाला चालायची सवय आहे. या घटनेवर 2000 च्या दशकात एक वैज्ञानिक पेपर प्रकाशित झाला होता. या पेपरमध्ये त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
हे ही वाचा : Crime: मी एकटीच असल्याचं सांगायची अन् हॉटेलवर बोलवायची, शारीरिक संबंधानंतर तरूणी…
हा पेपर प्रकाशित झाल्याच्या काही वर्षांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) चे मानसशास्त्रज्ञ, प्रोफेसर निकोलस हम्फ्रे कुटुंबाला भेटण्यासाठी तुर्कीला गेले होते. या कुटुंबात आई-वडिलांसह 18 मुले होती. या 18 व्यक्तींपैकी 6 मुले अशी होते की ज्यांना प्राण्याप्रमाणे चार पायांवर चालायला आवडायचे.
हे वाचलं का?
या कुटुंबाला भेटल्यावर हम्फ्रने म्हटले की, आधुनिक अवस्थेतील मनुष्य प्राण्याच्या अवस्थेत परत येऊ शकतो, असा विचार कधीच केला नव्हता. डोकंवर करून दोन पायांवर चालणे या गोष्टी माणसाला प्राण्यांप्रमाणे वेगळ्या ठरवतात. याशिवाय भाषा आणि इतर घटकही महत्वाचे असतात. मात्र हे कुटुंब खूपच वेगळं आहे.
मेंदूचा एक भाग संकुचित
या घटनेवर काही वैज्ञानिकांचं म्हणणे आहे, आनुवांशिक समस्येमुळे अशा घटना घडू शकतात. या कुटुंबातील पाच जण अजुनही जिवंत आहेत, ज्यांचे वय 22 ते 38 आहे. हे सर्वजण मेंदूच्या एका विशिष्ट आजाराशी पीडित आहेत. डॉक्टरांनी डॉक्युमेंटरीमध्ये एमआरआय स्कॅन देखील दाखवले, ज्यात असे दिसून आले की त्यांच्यापैकी प्रत्येकाने मेंदूचा एक भाग संकुचित आहे, ज्याला सेरेबेलर वर्मीस म्हणतात.
ADVERTISEMENT
याचा अर्थ असा होत नाही की, या आजाराचे रुग्ण चार पायावर चालायला लागतात. कारण सेरेबेलर वर्मीसचे इतर रूग्ण हे माणसाप्रमाणे दोन पायावर चालतात. याउलट या कुटुंबातील लोकं चार पायावर चालतात. या नागरीकांच्या अशा चार पायावर चालण्या मागचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Kolhapur: हिंदू-मुस्लिम प्रेमी युगलाची आत्महत्या, Instagram वर ‘ते’ स्टेटस ठेवलं अन्..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT