IPL 2025 Revised Schedule: नव्या IPL चं नवं Schedule.. पाहा तुमच्या आवडीच्या टीमची Match कोणत्या दिवशी
भारत-पाक युद्धाच्या तणावानंतर IPL चे सामने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता नवीन शेड्यूलनुसार, एकूण 17 सामने रंगणार आहेत. IPL च्या नवीन शेड्यूलमध्ये दोन डबल हेडरचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नव्या IPL सामन्यांचं शेड्यूल

भारत-पाक युद्धाच्या ताणावानंतर पुन्हा IPL चा थरार

तुमच्या आवडीची टीम कोणत्या दिवशी खेळणार?
IPL 2025 Revised Schedule: 2025 मधील IPL चे सामने आता पुन्हा सज्ज आहेत. भारत-पाक युद्धाच्या तणावानंतर हे सामने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता, नवीन वेळापत्रकानुसार, सामना शनिवार (17 मे) पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार असून तो बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी रोजी होणार आहे. यादरम्यान, एकूण 17 सामने रंगणार आहेत. IPL च्या नवीन शेड्यूलमध्ये दोन डबल हेडरचा समावेश आहे. मागील दिवसांत भारत-पाक युद्धामुळे IPL चे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.
सरकार आणि सुरक्षा दलांसोबतच्या चर्चेनंतर BCCI ने हा निर्णय घेतला होता. सर्व प्रमुखांच्या संमतीने, IPL च्या या सीझनमधील उर्वरित सामने आता पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर, 8 जून रोजी पंजाब आणि दिल्ली यांच्यातील IPL सामना स्थगित करण्यात आला होता.
'या' दिवशी डबल हेडर मॅच
नवीन शेड्यूलनुसार, IPL 2025 मधील उर्वरित 17 सामने 6 वेगवेगळ्या ठिकाणांवर रंगणार आहेत. पुढील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना दोन (डबल हेडर) म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे डबल हेडर रविवारच्या दिवशी म्हणजेच (18 मे आणि 25 मे रोजी) आयोजित करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा: Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर
प्लेऑफ सामन्यांचं शेड्यूल
आयपीएल 2025 च्या प्लेऑफ राउंडचे संपूर्ण वेळापत्रक नेहमीच या टूर्नामेंटचा सर्वात रोमांचक भाग असतो. यामध्ये अव्वल 4 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत उतरतात. याचे शेड्यूल पुढीलप्रमाणे:
क्वालिफायर 1 – 29 मे 2025
एलीमिनेटर – 30 मे 2025
क्वालिफायर 2 – 1 जून 2025
फाइनल – 3 जून 2025
या चारही सामन्यांचे ठिकाण BCCI द्वारे काही काळातच घोषित केले जातील. हे सामने मुख्य शहरांमध्ये किंवा सुरक्षिततेला लक्षात घेऊन किनारी भागात आयोजित केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा: मालव्य राजयोग... 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब खुलणार, होईल पैशांचा प्रचंड पाऊस!

प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर घोषित करण्यात येतील. तसेच, कोलकाता येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. अद्याप हे ठिकाण घोषित झालं नसून ते नंतर ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.