Viral Video: हळदीत बैल आणला, चिक्कार पैसा उडवला.. चिडलेल्या बैलाने करवल्यांनाच उडवलं!
बैलानं वाट मोकळी करण्यासाठी जोरजोरात धावण्यास सुरुवात केली. यामुळे उपस्थित पाहुणे आणि कुटुंबीय घाबरले. काही जणांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला, तर काही जणांनी बैलाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळल्यानं राडा

तरूणांना बैल नाचवत त्याच्यावर उधळले होते पैसे
Kalyan Haladi Viral Video : कल्याणमध्ये शिळ रोडवरील पडले गावात एक विचित्र घटना घडली. पडले गावात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या घरी आयोजित हळदीच्या कार्यक्रमात बैलाला नाचवण्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय घडले नेमके?
पाटील कुटुंबियांच्या घरी हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. ऑर्केस्ट्राच्या तालावर सर्वजण नाचत असताना, काही तरुणांनी उत्साहाच्या भरात एक बैल कार्यक्रमस्थळी आणला. बैलाच्या समोर पैसे उधळण्याचा प्रकार सुरू झाला, ज्यामुळे चांगलाच गोंधळ झाला. हा उत्साह फार काळ टिकला नाही. बैल अचानक बिथरला आणि त्यानं समोर दिसेल त्या दिशेने धावत पाहुण्यांना तुडवण्यास सुरुवात केली. बैल उधळल्यामुळे तुफान राडा सुरू झाला.
हे ही वाचा >> 'नयनतारा'च्या प्रेमात वेडा झाला 'छोटा मटका', तिच्या जवळ जाणाऱ्या ब्रम्हाला संपवलं, ताडोबाच्या जंगलातली सिनेमॅटीक स्टोरी
बैलानं वाट मोकळी करण्यासाठी जोरजोरात धावण्यास सुरुवात केली. यामुळे उपस्थित पाहुणे आणि कुटुंबीय घाबरले. काही जणांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला, तर काही जणांनी बैलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं, या धावपळीत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. नाहीतर नवरदेवासोबत त्या जखमींनाही हळद लावण्याची नामुष्की ओढावली असती.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
हे ही वाचा >> कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि कुकडेचं प्रकरण... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थितांपैकी काहींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये बैलाचा धिंगाणा, पाहुण्यांची धावपळ स्पष्टपणे दिसतेय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेची खिल्ली उडवली, तर काहींनी अशा प्रकारच्या बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त केली.