कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी

ओमकार वाबळे

पुण्यातील कॅम्पमधील एका बंगल्याच्या माध्यमातून परदेशी तरूणींचं सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. काही लोक अलिशान गाड्यांमधून यायचे, या बंगल्याच्या बाहेर उभ्या तरूणी या गाडीत बसायच्या आणि जायच्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दीपक मानकर यांच्या राजीनाम्यामुळे चर्चा

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष होते मानकर

point

शंतनू कुकडे प्रकरणाशी काय कनेक्शन?

point

पुण्यातील कॅम्पमधील बंगल्यात नेमकं काय चालायचं?

Dipan Mankar Case Pune: राष्ट्रवादी कांँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि अजितदादांचे निकटवर्तीय दीपक मानकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मानकर यांचं नाव एका फसवणुकीच्या प्रकरणात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मानकर यांनी हा राजीनामा अजित पवार आणि एनसीपी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, या प्रकरणामुळे शंतनू कुकडे आणि कॅम्पमधील बंगल्याचं ते प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.  

हे ही वाचा >> पिंपरी चिंचवड हादरलं! चाकणमध्ये नाईट शिफ्टला निघालेल्या महिलेचा पाठलाग करुन केला अतिप्रसंग

दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मानकर यांच्याविरुद्ध 1 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारात बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. हा पैसा एका माजी एनसीपी पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय आणि तो नेता सध्या बलात्कार प्रकरणात अटकेत आहे. मानकर यांना अटक होऊ शकते, त्यामुळेच त्यांनी राजीनाम दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीचा नेता कोण होता आणि त्याचं प्रकरण काय होतं असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. 

कॅम्पमधील बंगल्याचं प्रकरण

पुण्यातील कॅम्पमधील एका बंगल्याच्या माध्यमातून परदेशी तरूणींचं सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. काही लोक अलिशान गाड्यांमधून यायचे, या बंगल्याच्या बाहेर उभ्या तरूणी या गाडीत बसायच्या आणि जायच्या. हा सिलसिला अनेक दिवस सुरू दिसल्यानं काहींनी तक्रार केली. त्यावेळी पोलिसांसमोर तपासात एक नाव समोर आलं होतं. ते नाव होतं शंतनू कुकडे. पोलिसांना लक्षात येतं की हा आरोपी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पोलीस पुढे तपास करतात तेव्हा दीपक मानकर हे नाव समोर येतं. 

मानकर आणि कुकडेचं काय कनेक्शन? 

मानकर यांच्यासह या प्रकरणात FIR मध्ये आणखी दोन नावं आहेत. रौनक जैन आणि शंतनू कुकडे यांची ही नावं आहेत. कुकोडे हा सुद्धा आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होता. तो त्याच्या एनजीओमार्फत परराज्यातील आणि परदेशातील मुलींना मदत देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर आणि मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत.त्याच्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp