'नयनतारा'च्या प्रेमात वेडा झाला 'छोटा मटका', तिच्या जवळ जाणाऱ्या ब्रम्हाला संपवलं, ताडोबाच्या जंगलातली सिनेमॅटीक स्टोरी

मुंबई तक

मंगळवारी सकाळी काही पर्यटकांना ‘छोटा मटका’ लंगडत चालताना दिसला. त्याचं तोंड रक्ताने माखलेलं होतं. त्यावेळी पर्यटकांनी ही माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागासमोर काय आलं ते पाहा...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ताडोबा अंधारी प्रकल्पात नेमकं काय घडलं?

point

ब्रम्हा आणि छोटा मटकाची झुंज नेमकी का झाली?

Tadoba Andhari tiger Reserve : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प... महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या वन्यप्रेमींची ही पंढरी आहे. मात्र, याच प्रकल्पात सध्या एका प्रेमवेड्या वाघाची चर्चा सुरूय. प्रेमात वेड्या झालेल्या या वाघानं आपलं प्रेम असलेल्या वाघिणीच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येकाचा कसा फडशा पाडला याचीच सध्या चर्चा सुरूय.  

हे ही वाचा >> कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि कुकडेचं प्रकरण... अजित पवारांच्या नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी

घडलं असं की, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील खडसंगी वनपरिक्षेत्रात सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास एक थरारक झुंज झाली. यात ताडोबाची शान असलेल्या ‘छोटा मटका’ या वाघाने ‘नयनतारा’च्या प्रेमात पडलेल्या ‘ब्रह्मा’ (वय ३ वर्षे) या वाघाला ठार केलं. या झुंजीत ‘छोटा मटका’ स्वतःही जखमी झाला. ही घटना निमढेला बीटमधील कक्ष क्रमांक 63 मध्ये घडली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

अख्ख्या जंगलात छोटा मटकाचाच दबदबा...

हे ही वाचा >> बकऱ्या चारणाऱ्या म्हाताऱ्यासमोर तरूणीने बनवला अश्लील व्हिडीओ, पोलिसांनी दोघांना...

रामदेगी (ता. चिमूर) परिसरातील ताडोबाचा बफर झोन पर्यटकांमध्ये ‘छोटा मटका’ आणि ‘नयनतारा’ या वाघांमुळे प्रसिद्ध आहे. या जंगलावर ‘छोटा मटका’चं चांगलंच वर्चस्व आहे. मात्र, इथंच एन्ट्री झाली 'ब्रम्हा'ची. ‘नयनतारा’सोबत अधिवास वाढवण्यासाठी ‘ब्रह्मा’ काही दिवसांपासून या परिसरात फिरत होता. याची कुणकुण ‘छोटा मटका’ला लागली होती. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेच्या वेळी ‘छोटा मटका’ने ‘ब्रह्मा’वर हल्ला चढवला, दोघांमध्ये तुफान झुंज झाली आणि त्याला ठार केलं. 

पर्यटकांनी दिली माहिती, वनविभागाचे शवविच्छेदन

मंगळवारी सकाळी काही पर्यटकांना ‘छोटा मटका’ लंगडत चालताना दिसला. त्याचं तोंड रक्ताने माखलेलं होतं. त्यावेळी पर्यटकांनी ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभागानं शोधमोहीम राबवली असता ‘ब्रह्मा’ मृत अवस्थेत आढळला. मृत वाघाला शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आलं. लोकमत वृत्त समुहाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नयनताराच्या जवळ गेलेल्या सगळ्यांना संपवलं

छोटा मटकाने यापूर्वीही आपल्या परिसरात कोणालाही एन्ट्री करू दिलेली नाही. त्याने यापूर्वी मोगली आणि  बजरंग या वाघांनाही मागच्या काही वर्षात ठार केलं आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्यानंतर आता छोटा मटकाने ‘ब्रह्मा’ला ठार करून पुन्हा एकदा आपणच ताडोबाचा राजा असल्याचं दाखवून दिलं. 

एखाद्या सिनेमातील सुंदर नायिकेसाठी वेड्या झालेल्या नायकासारखीच ही छोटा मटकाची कहाणी आहे. ताडोबातील या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींच्या चर्चांमध्ये सध्या ही एकच गोष्ट सुरूय. छोटा मटकाच्या दबदब्याचीच चर्चा प्रत्येकजण करतोय.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp