Maharashtra Weather: मुंबई शहर आणि उपनगरात धो धो पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यात सोसाट्याचा वारा घोंगावणार

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

ADVERTISEMENT

मुंबईला जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचल्याची नोंद
मुंबईला जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचल्याची नोंद
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काल गुरुवारी 14 मे रोजी मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने हलका पाऊस, 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने बांधला होता. अशातच महाराष्ट्रातील आजचं हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

कसं असेल महाराष्ट्रातील आजचं हवामान?

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हे ही वाचा >> भूषण गवईंनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी राणेंना दिला झटका, पुण्यातील 'ते' प्रकरण काय?

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग),  मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> पुण्यातील कोयता गँगचा हा नवा Video तुम्हाला टाकेल हादरवून, भर रस्त्यात...

 

हे वाचलं का?

    follow whatsapp