मालव्य राजयोग... 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब खुलणार, होईल पैशांचा प्रचंड पाऊस!

मुंबई तक

Astrology 2025 : मालव्य राजयोगाला ज्योतिषास्त्रामध्ये महत्त्व आहे. याच मालव्य राजयोगाचा विविध राशींवर परिणाम होताना दिसतो. याचाच सकारात्मक परिणाम हा 4 राशींवर दिसून येणार आहे.

ADVERTISEMENT

Astrology 2025 Malavya Raja Yoga Astrology News
Astrology 2025 Malavya Raja Yoga Astrology News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मालव्य राजयोगाला ज्योतिषास्त्रामध्ये महत्त्व आहे.

point

याच मालव्य राजयोगाचा विविध राशींवर परिणाम होताना दिसतो.

Astrology 2025 : मालव्य राजयोगाला ज्योतिषास्त्रामध्ये महत्त्व आहे. याच मालव्य राजयोगाचा विविध राशींवर परिणाम होताना दिसतो. त्यापैकी एक रास म्हणजे शुक्र रास होय. शुक्र रास ही 29 मे 2025 रोजी वृषभ या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात शुक्र चंद्राच्या मध्यस्थानी म्हणजेच (1,4,7,10) असेल. हा योगा आल्यास व्यक्तीला आकर्षक व्यक्तीमत्व, संपत्ती, धन दौलत आणि सामाजात एक वेगळा मान मिळेल. सौंदर्य, प्रेम संबंधा वाढेल. यामुळे जीवनात आनंद मिळेल आणि स्थिरता प्राप्त होईल. 

हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबई शहर आणि उपनगरात धो धो पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यात सोसाट्याचा वारा घोंगावणार

याच मालव्य राजयोगामुळे व्यक्तीच्या वैवाहिक आणि सामाजिक जीवनात चांगला बदल घडताना दिसतो. शुक्र ग्रहाची शुभ स्थिती व्यवसाय, नोकरीसारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळवून देते. सध्याची परिस्थिती पाहता, आर्थिक गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि चैनीच्या वस्तू खरेदीची शक्यता नाकारता येणार नाही. कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि नवीन संधी मिळवण्यासाठी सध्याचा हा काळ सकारात्मक आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीत शुक्र हा पहिल्या घरात भ्रमण करताना दिसणार आहे. अशा काळात गुरू हा मिथुन राशीत असणार आहे. तर सूर्य हा कर्क राशीत असणार आहे. यामुळे शुक्राचा प्रभाव आणखी मजबूत होणार आहे. तसेच या योगामुळे नवीन वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद होईल. अविवाहितांना विवाहाचे अनेक योग समोरून चालून येतील. कामाच्या ठिकाणी नवीन सहकाऱ्यांची मदत ही मोलाची असणार आहे.

सिंह रास
 
सिंह राशीसाठी शुक्र दहाव्या भावात भ्रमण करण्याचा योग आहे. अशावेळी मंगळ सिंह राशीत असणार आहे. तर गुरू हा मिथुन राशीत असेल. ज्यामुळे शुक्राच्या परिणाम हा अधिकता मजबूत होईल. यामुळे नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीत वाढ होणार आहे. तसेच सरकारी कामात यश संपादन करण्याची संधी प्राप्त होईल. दिर्घकालीन करण्यात येणारी गुंतवणूक आणि भविष्यातील योजनांसाठी हा काळ शुभ मानला जातो. 

हेही वाचा : पुण्यातील कोयता गँगचा हा नवा Video तुम्हाला टाकेल हादरवून, भर रस्त्यात...

कन्या रास

कन्या राशीत शुक्र हा 9 व्या भावात आहे. या काळात शनि कुंभ राशीत असणार आहे, गुरू मिथून राशीत असणार आहे. ज्यामुळे होणारा प्रभाव हा अगदी संतुलित असणार आहे. यामुळे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या योगामुळे अचानकपणे आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. तिर्थक्षेत्राला जाण्याचा योग चांगला आहे.

मकर रास

मकर राशीसाठी शुक्र हा पाचव्या घरात भ्रमण करणार आहे. तसेच मंगळ हा सिंह राशीत वावरणार आहे. ज्यामुळे शुक्र अधिकता प्रभावी असणार आहे. यामुळे मकर राशीतील लोकांच्या आयुष्यात प्रेमसंबंध निर्माण होईल. ज्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल. अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले योग चालून येतील. आपल्या मुलांकडून आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. त्यांच्या यशामुळे आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp