पालकांनी व्हा सावध! मुलांसाठी ‘ही’ 2 भारतीय औषधं घातक; WHO चा इशारा
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कफ सिरप संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट जारी केली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका कफ सिरपमध्ये अशा दोन रसायनांचा वापर करण्यात आला आहे जे चार वर्षांखालील मुलांना देता येत नाही.
ADVERTISEMENT
DCGI Update About Cough Syrup : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरप संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट जारी केली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका कफ सिरपमध्ये अशा दोन रसायनांचा वापर करण्यात आला आहे जे चार वर्षांखालील मुलांना देता येत नाही. या दोन औषधांची नावं क्लोरोफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइफ्राइन असं आहे. दोन्ही औषधांच्या मिश्रणापासून तयार केलेलं सिरप किंवा गोळ्या सामान्य सर्दीच्या उपचारासाठी वापरले जाते. (WHO Alert About Cough Syrup Which produce in india DCGI Bans For Children)
ADVERTISEMENT
एका अहवालानुसार, या सिरपच्या वापरामुळे जगभरात 141 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या औषधांच्या लेबलवर यासंदर्भात चेतावणी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वाचा : विरोधी पक्षांच्या 143 खासदारांचं निलंबन, शरद पवार म्हणाले, ‘संसदेच्या इतिहासात…’
DCGI ने 18 सप्टेंबर रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. त्यात लिहिलं आहे की, ‘प्रोफेसर कोकाटे समितीच्या शिफारशीच्या आधारावर, क्लोरोफेनिरामाइन मॅलेट IP 2mg + फिनाइफ्राइन HCI IP 5mg Drop/ml च्या उत्पादन आणि विपणनासाठी NOC जारी करण्यात येत आहे.’
हे वाचलं का?
पुढे लिहिले आहे की, ‘लहान मुलांसाठी कफ सिरप फॉर्म्युलेशनच्या जाहिरातीबाबत चिंता व्यक्त होत आहे. समितीने शिफारस केली आहे की, हे औषध चार वर्षांखालील मुलांना देऊ नये. तसेच, कंपन्यांनी लेबल्स आणि पॅकेजेसवर या संदर्भात इशारे नमूद केले पाहिजेत. सर्व उत्पादकांना लेबल आणि पॅकेजेसवर चेतावणी नमूद करण्याचे निर्देशही दिले आहेत.’
वाचा : RSS on Caste Census : जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…
या प्रकरणावर, ज्येष्ठ बालरोगतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराईडची मान्यता नाही आहे. दोन ते चार वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे सावधगिरीने वापरावे. जरी प्रेस्क्राइब केलं असलं तरी कमी कालावधीसाठी किमान डोस घ्यावा. तसंच, औषधाच्या दुष्परिणामांबद्दल सावधगिरी बाळगा.’
ADVERTISEMENT
वाचा : Mla Disqualification : खरी शिवसेना कुणाची, कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर
महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, याच वर्षी ऑगस्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात तयार होणाऱ्या कफ सिरप औषधांबद्दल पाचवा इशारा दिला होता. संघटनेने ७ ऑगस्ट रोजी इराकमध्ये भारतीय कंपनीने बनवलेल्या औषधांची प्रयोगशाळेत चाचणी केली होती. त्यानंतर ही औषधी घातक आणि खराब असल्याचे जाहीर केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT