खिडकी उघडली अन् गेला जीव! क्षणार्धातच महिलेची होरपळून झाली राख

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

woman died by electrocuted in greater noida
woman died by electrocuted in greater noida
social share
google news

Woman Electrocuted : 80 वर्षाची महिला घराच्या बाल्कनीत येते. खिडकी उघडते आणि पापणी लवण्याच्या आत तिचा जीव जातो. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडलीये दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अवघ्या काही क्षणात महिला होरपळून राख होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडातील रबूपुरा पोलीस ठाणे हद्दीतील मिर्झापूर गावात ही घटना घडली आहे. 80 वर्षीय महिला उच्च दाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली आणि होरपळून राख झाली. विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यानंतर महिलेच्या शरीराने पेट घेतला. ही घटना बघत असलेल्या एका व्यक्तीने याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला.

व्हिडीओत काय?

महिला बाल्कनीत येऊन खिडकी उघडते. त्यानंतर काही क्षणातच उच्च दाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्यानं तिला करंट लागतो. त्यानंतर महिलेच्या अंगावरील कपडे पेटताना दिसत आहे. काही सेकंदातच महिलेचा जळून मृत्यू होता.

हे वाचलं का?

वाचा >> Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story

ही घटना अवघ्या काही क्षणात घडली आणि इतकी भयंकर होती की, कुणाचीही महिलेला वाचवायला जाण्याची हिंमत झाली नाही. लोक बघतच राहिले. तर काहींनी व्हिडीओ बनवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

ADVERTISEMENT

वाचा >> Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…

ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुमार यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, “रबुपुरा पोलीस ठाणे हद्दीत मिर्झापूर गाव आहे. अंगुरी देवी (वय 80) या येथील रहिवासी होत्या. अंगुरी देवी या बाल्कनीत उभ्या होत्या. त्याचवेळी त्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्या आणि लगेच त्याचा होरपळल्या गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT