मोठी बातमी! आयपीएल लवकरच सुरू होणार, 'या' 4 ठिकाणी खेळवणार सामने, फायनल कुठे रंगणार?
IPL 2025 Latest Update : भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (2025) एका आठवड्यासाठी स्थगित करावं लागलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आयपीएल 2025 बाबत मोठी अपडेट

4 वेन्यूवर होऊ शकतात सामने

फायनलचा सामना कुठे होणार?
IPL 2025 Latest Update : भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (2025) एका आठवड्यासाठी स्थगित करावं लागलं होतं. परंतु, आता दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीजफायरनंतर आयपीएल लवकरच सुरु होऊ शकतो. इंडिया टुडेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल पुन्हा 16 किंवा 17 मे रोजी सुरु होऊ शकतं. यासाठी नवीन शेड्युल लवकरच जारी केला जाणार आहे.
4 वेन्यूवर होऊ शकतात सामने
आयपीएल 2025 चे उर्वरित सामने आता 4 ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. याची सुरुवात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या सामन्याने होऊ शकते. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळवला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने सर्व हितचिंतकांना याबाबत सूचित केलं आहे. त्यामुळे संघ त्यांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला परत बोलावत आहेत.
हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम ... 8 कंपन्यांचं 1.6 लाख कोटींचं नुकसान, रिलायन्सलाही फटका
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना होऊ शकतो. तर कोलकातामध्ये क्वालिफायर-2 सोडून फायनलचा सामना होऊ शकतो. फायनलचा सामना 30 मे किंवा 1 जूनला होण्याची शक्यता आहे. जर हवामान खराब राहिलं तर कोलकाताच्या ऐवजी अहमदाबादमध्ये हा सामना खेळवला जाऊ शकतो.
आयपीएलच्या या सीजनमध्ये आतापर्यंत एकूण 57 सामने खेळवण्यात आले आहेत. 58 वा सामना 8 मे रोजी धरमशाला येथे पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळवण्यात आला. परंतु, 10.1 षटकातनंतर या सामना थांबवण्यात आला. हा सामना पुन्हा खेळवण्यात येणार आहे की नाही, हे आतापर्यंत निश्चित झालं नाहीय. या सामन्यात पंजाब किंग्जने 10.1 षटकात 1 विकेट्स गमावून 122 धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर आता लीग स्टेजचे फक्त 12 सामने राहिले आहेत. त्यानंतर चार प्ले ऑफचे सामने आहेत.