भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम ... 8 कंपन्यांचं 1.6 लाख कोटींचं नुकसान, रिलायन्सलाही फटका

मुंबई तक

बँकिंग क्षेत्रातील शेअर्ससाठीही हा आठवडा निराशाजनक ठरला. एचडीएफसी बँकेची मार्केट व्हॅल्यू 27 हजार 062 कोटी रुपयांनी कमी होऊन 14 लाख 46 हजार 294.43 कोटी रुपयांवर आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India Pakistan Conflicts : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागचे काही दिवस युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती.  याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आलाय.  अनेक बड्या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 30 शेअर्सचा समावेश असलेल्या सेंसेक्समधील टॉप-10 पैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल (Market Capitalization) तब्बल 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक घटले. याचा सर्वाधिक फटका मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance Industries) बसला असून, कंपनीला सुमारे 60,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

सेंसेक्समधील 8 टॉप कंपन्यांचे नुकसान

हे ही वाचा >> "ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच...", हवाई दलानं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडा पाकिस्तानी शेअर बाजारासाठी 2021 नंतरचा सर्वात वाईट आठवडा ठरला, तर भारतीय शेअर बाजारातही काही दिवस घसरण दिसून आली. या काळात बीएसई सेंसेक्समध्ये 1,047.52 अंक किंवा 1.30 टक्के घट नोंदवली गेली. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यासारख्या आघाडीच्या कंपन्यांना मोठा तोटा झाला.

रिलायन्स-आयसीआयसीआय बँकेला सर्वाधिक नुकसान

गुंतवणूकदारांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागलेल्या कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल ठरली. रिलायन्सच्या शेअर्समध्ये (RIL Stock) आलेल्या घसरणीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 59 हजार 799 कोटी रुपयांनी घटून 18 लाख 64 हजार 436 कोटी रुपयांवर आलं.  दुसऱ्या क्रमांकावर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक आहे. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू (ICICI Bank MCap) 30 हजार 185  कोटी रुपयांनी कमी होऊन 9 लाख 90 हजार 015 कोटी रुपयांवर आली. 

हे ही वाचा >> "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

एचडीएफसी, एसबीआयलाही तोटा

बँकिंग क्षेत्रातील शेअर्ससाठीही हा आठवडा निराशाजनक ठरला. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 27 हजार 062 कोटी रुपयांनी कमी होऊन 14 लाख 46 हजार 294.43 कोटी रुपये राहिले. तसंच, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेची (SBI) मार्केट व्हॅल्यू 18 हजार 429 कोटी रुपयांनी घसरून 6 लाख 95 हजार 584 कोटी रुपये झाले. बँकांप्रमाणेच फायनान्स कंपनी बजाज फायनान्सची मार्केट व्हॅल्यू (Bajaj Finance MCap) 13 हजार 798 कोटी रुपयांनी घटून 5 लाख 36 हजार 927. कोटी रुपये राहिले.

हे वाचलं का?

    follow whatsapp