"पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी परदेशातील राष्ट्रपतींनी युद्धबंदीची घोषणा का केली? शिमला करार (1972) पासून, भारत नेहमीच तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे, मग आपण आता तो का स्वीकारला आहे? असा सवाल ओवैसींनी केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा

point

ट्रम्प यांनी केला मध्यस्थिचा दावा

India Pakistan Ceasfire : सिमेवर निर्माण झालेल्या युद्धसदृष्य स्थितीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर अखेर काल सहमती झाली. पण एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना अनेक सवाल उपस्थित केले. जोपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्यासाठी आपल्या भूमीचा वापर करत राहील, तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता शक्य नाही असं ओवैसी म्हणाले आहेत. युद्धबंदी असो वा नसो, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

हे ही वाचा >> 'पाकिस्तान ऐकायला तयार नाही हल्ला सुरूच, आता आम्ही...', Army ला थेट कारवाईचे आदेश

ओवैसी यांनी भारतीय लष्कर आणि सरकारचं समर्थन केलं आणि सांगितलं की, मी नेहमीच बाह्य आक्रमणाविरुद्ध सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे.  भविष्यातही आम्ही याच भूमिकेत असू. मी आपल्या सैन्याच्या शौर्याचं आणि अद्वितीय कौशल्याचं कौतुक करतो. मी शहीद जवान एम मुरली नाईक, एडीसीसी राज कुमार थापा यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या संघर्षात मारले गेलेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांसाठी प्रार्थना करतो. ओवैसींनी आशा व्यक्त केली की, युद्धबंदीमुळे सीमावर्ती भागातील लोकांना दिलासा मिळेल. मात्र, यावेळी त्यांनी सरकारला सवालही केले आहेत. 

ओवैसी यांचे 4 सवाल काय? 

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी परदेशातील राष्ट्रपतींनी युद्धबंदीची घोषणा का केली? शिमला करार (1972) पासून, भारत नेहमीच तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे, मग आपण आता तो का स्वीकारला आहे? मला आशा आहे की काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयीकरण होणार नाही, कारण तो आपला अंतर्गत प्रश्न आहे असं ओवैसी म्हणाले. 

हेे ही वाचा >> पाकिस्तानला युद्धबंदीचा अर्थ समजतो का? Trump यांच्या घोषणेनंतरही काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले, तुफान गोळीबार सुरू

2. आपण तटस्थ क्षेत्रात चर्चा करण्यास का सहमती दर्शवली? या चर्चेचा अजेंडा काय असेल? अमेरिका हमी देईल का की पाकिस्तान भविष्यात त्याच्या भूमीवरून दहशतवादाला प्रोत्साहन देणार नाही?

3. आपण पाकिस्तानला भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांपासून रोखण्याच्या आपल्या ध्येयात यशस्वी झालो आहोत का, की युद्धबंदी हाच आपला एकमेव उद्देश होता?

4. पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आपली आंतरराष्ट्रीय मोहीम सुरूच राहिली पाहिजे.

दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलेल्या या चार प्रश्नांवर आता सरकारकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp