'पाकिस्तान ऐकायला तयार नाही हल्ला सुरूच, आता आम्ही...', Army ला थेट कारवाईचे आदेश

मुंबई तक

भारत-पाक यांच्यात कोणत्याही प्रकारची युद्धबंदी अद्याप झालेली नाही. कारण पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने भारतावर हल्ला करण्यात येत आहे. याचबाबत पत्रकार परिषद घेत आता नेमकी माहिती देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Army ला थेट कारवाईचे आदेश
Army ला थेट कारवाईचे आदेश
social share
google news

नवी दिल्ली: 'भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यासाठी मी मध्यस्थी केली.' असं ट्वीट करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं. पण त्यांच्या या ट्विटला 3 तास उलटत नाही तोच पाकिस्तानने भारतावर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. तर दुसरीकडे LOC जवळ देखील सातत्याने गोळीबार करण्यात आला. 

पाकिस्तानने केलेले हे हल्ले म्हणजे शस्त्रसंधीचं पूर्णपणे उल्लंघन आहे. ज्यामुळे भारताने देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून पाठविण्यात आलेले सगळे ड्रोन्स भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे नेस्तनाबूत करण्यात आले. 

एकीकडे स्वत: ट्रम्प यांनी युद्धबंदी होत असल्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे पाकिस्तानने अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचं उल्लघंन करत त्यांची नेमकी मानसिकता काय आहे हे दाखवून दिलं आहे.

हे ही वाचा>> पाकिस्तानला युद्धबंदीचा अर्थ समजतो का? Trump यांच्या घोषणेनंतरही काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले, तुफान गोळीबार सुरू

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र. या प्रकरणी ठोस आणि कठोर पावलं उचलावेत असे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp