10 वी चा निकाल DigiLocker वर जाऊन करा डाऊनलोड, यासाठी सविस्तर बातमी वाचा
Maharashtra Board SSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी चा निकाल 2025 रोजी लवकरच जाहीर होईल. शिक्षण मंडळाने 10 वी च्या निकालाबाबत मोठी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वी चा निकाल 2025 रोजी लवकरच जाहीर होईल.
निकाल डिजीलॉकरवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बातमी वाचा
Maharashtra Board SSC Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी चा निकाल 2025 मध्ये लवकरच जाहीर होईल. यावर्षी एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्डाच्या निकालाची वाट पाहत आहेत. शिक्षण मंडळाने याबाबत मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बोर्डात इयत्ता 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. ज्यात 8 लाखांहून अधिक विद्यार्थी, 7 लाखांहून अधिक विद्यार्थींनी आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही परीक्षा मुंबई, पुणे नागपूर आणि कोकणासह अनेक विभागांमध्ये घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केले जातील.
दहावी बोर्डाच्या निकालाची घोषणा केल्यानंतर, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला आणि DigiLocker वर तपास येईल. शिवाय, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांकडे केवळ आपला सीट नंबर आणि आपल्या आईचे नाव नमूद करावं.
महाराष्ट्र एसएससी 10 वी बोर्डाचा निकाल कसा बघावा?
महाराष्ट्र एसएससी 10 वी बोर्डाचा निकाल तपासण्यासाठी वेबसाईटला भेट द्या.










