VIDEO: बघा पुणेकरांनो... पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच गेला खड्ड्यात!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune Truck Incident: पुणे महानगरपालिकेचा एक संपूर्ण ट्रकच हा अचानक खड्ड्यात गेल्याची घटना ही घडली आहे. ज्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

social share
google news

Pune Truck Incident Video: पुणे: पुण्यातील समाधान चौकात अचानक रस्ता खचल्याने संपूर्ण ट्रकच नाल्यात गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पुण्यातील सीटी पोस्टजवळ अचानक रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रकच हा खड्ड्यात गेला. ज्याची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (in pune the entire truck of the pune municipal corporation went into the pit video went viral)

ADVERTISEMENT

जिथे हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक हा नाल्यातच गेला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक असून काही मटेरिअल घेऊन तो समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. हा ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक हे खचले आणि अख्खा ट्रक खाली गेला. 

या ट्रकमधील चालक आणि इतर लोक सुस्थितीत आहेत की नाही हे याची अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचीही माहिती घेतली जात आहे. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT