भारतात आढळला चौथा रुग्ण! काय आहे मंकीपॉक्स, संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात?
कोरोनाच्या साथीनंतर आता मंकीपॉक्सने चिंता वाढवलीये. जगभरात रुग्ण आढळून येत असलेल्या मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण देशात आढळून आला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली असून, या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नाही. यापूर्वी आढळून आलेले तिन्ही रुग्ण युएईमधून परतले होते. दिल्लीत मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद राजधानी दिल्लीत मंकीपॉक्स […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या साथीनंतर आता मंकीपॉक्सने चिंता वाढवलीये. जगभरात रुग्ण आढळून येत असलेल्या मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण देशात आढळून आला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली असून, या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नाही. यापूर्वी आढळून आलेले तिन्ही रुग्ण युएईमधून परतले होते.
दिल्लीत मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद
राजधानी दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूनं धडक दिलीये. मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला असून, मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाचं वय ३१ वर्ष आहे. या रुग्णाने परदेश प्रवास केल्याची पार्श्वभूमी नाही. रुग्णाला प्रचंड ताप भरला आणि त्वचेवर जखमा दिसून आल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं.
दिल्ली में मंकीपॉक्स का पहला मामला सामने आया। इसकी पुष्टि स्वास्थ्य मंत्रालय ने की है। मरीज मौलाना आजाद मेडिकल कॉलेज में भर्ती है। उसको (31 वर्षीय व्यक्ति) बुखार और त्वचा पर घाव होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया और उसकी कोई ट्रेवल हिस्ट्री नहीं है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 24, 2022
मंकीपॉक्स आजार काय आहे?
अमेरिकच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल म्हणजे साथरोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा आजार पहिल्यांदा १९५८ मध्ये आढळून आला. त्यावेळी संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या वानरांमध्ये हा आजार आढळून आला होता. त्यामुळे या आजाराचं नाव मंकीपॉक्स असं ठेवण्यात आलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीप्रमाणे मंकीपॉक्स आजाराचा पहिला रुग्ण १९७० मध्ये आढळून आला. तेव्हा काँगोमधील एका ९ वर्षाच्या मुलाला मंकीपॉक्स आजाराची लक्षणं आढळून आली होती. १९७० नंतर ११ आफ्रिकी देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले होते.