Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही... - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…

abominable crime of 17 year old girl raped by 2 minor boys

Crime: मिसिसिपी (अमेरिका): एका 17 वर्षीय मुलीने दोन अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितांपैकी एक मुलगा हा 10 वर्षांचा आहे. तर दुसरा 14 वर्षांचा आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. 17 वर्षीय अमिरेकल मॉर्गन असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या आईविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. कारण मुलीच्या आईने मुलांचा एक ग्रुप तयार केला ज्यांनी-ज्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्या लोकांना मारहाण करण्याचे काम दिलं होतं. ही घटना अमेरिकेतील मिसिसिपी येथील आहे. (abominable crime of 17 year old girl raped by 2 minor boys)

डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, अमिरेकलने मदर्स डेच्या दिवशी काही मुलांच्या ग्रुपसमोर अश्लील कृत्ये केली होती. हा प्रकार समोर घडताना पाहणाऱ्या मुलांनी पोलिसांना याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर अमिरेकलला ​​प्रौढ म्हणून आरोपांना सामोरे जावे लागेल. नंतर, तिच्या आईने कथितपणे एका टोळीच्या रूपात परिसरातील मुलांचा एक गट तयार केला आणि ज्या मुलांनी ही घटना पोलिसांना सांगितली त्या मुलांवर हल्ला करण्यास सांगितले.

या प्रकरणी जूनमध्ये सुनावणी होणार

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपी मुलीच्या आईने काही मुलांना एकत्र केले आणि ज्या लोकांनी ही घटना घडताना पाहिली त्यांना मारहाण करण्यास सांगितले. कोणीही त्यांच्यावर हल्ला करेल, त्यांना त्रास देईल हे काही खपवून घेतले जाणार नाही.’ असं पोलीस अधिकारी म्हणाले.

हे ही वाचा >> Nagpur : मायलेकराचा भयंकर शेवट! मुलाने संपवलं आयुष्य, आईनेही घेतलं विष

या कारणास्तव, मुलीच्या आईवर अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्ह्यांना मदत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आणि बलात्काराची तक्रार नोंदवलेल्या अल्पवयीन मुलांना धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी 8 जून रोजी होणार आहे.

वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात माय-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी आणि प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे ही घडल्याचं समजतं आहे. दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही? या कारणावरून दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि चीड आणणारी घटना समोरी आली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात रविवारी (21 मे) गुन्हा दाखल झाला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलाच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.

हे ही वाचा >> Crime: अंतर्वस्त्रावरुन राडा, पडला रक्ताचा सडा… 8 जण गंभीर जखमी

20 मे रोजी देखील आरोपी मुलगा हा रात्री घरी प्रचंड दारू पिऊन आला. पण तरीही त्याला अधिक दारू प्यायची होती. ज्यानंतर त्याने आपल्या आईकडे आणखीन दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करायला सुरुवात केली. ज्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी मुलाचे वडील देखील घरातच होते. ते देखील त्याला त्याच्या दारू पिण्याच्या सवयीवरुन बोलू लागले.

पण जेव्हा आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे मिळणार नाही हे लक्षात आलं तेव्हा त्याने स्वतःच्या वडिलांचे आधी दोरीने हात-पाय बांधले. त्यानंतर जन्मदात्या आईला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. पण नराधम मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या वडिलांसमोरच स्वत:च्या आईवर बलात्कार केला. आईवरच लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलाने त्यांना धमकी देखील दिली.

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo