Crime news: ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण; नागपूरमधील लाजिरवाणी घटना - Mumbai Tak - beating woman for overtaking shameful incident in nagpur - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया

Crime news: ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण; नागपूरमधील लाजिरवाणी घटना

ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना नागपुरमध्ये (Crime news) घडली आहे. जरीपटका पोलीस स्थानकाचे (Jaripataka Police Station) पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी मुंबई Tak ला दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद केला जात आहे. सदरील व्हिडीओ तुफान वायरल होत असून अनेकजण याप्रकाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. (Beating […]
Updated At: Mar 24, 2023 01:39 AM

ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना नागपुरमध्ये (Crime news) घडली आहे. जरीपटका पोलीस स्थानकाचे (Jaripataka Police Station) पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी मुंबई Tak ला दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद केला जात आहे. सदरील व्हिडीओ तुफान वायरल होत असून अनेकजण याप्रकाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. (Beating woman for overtaking; Shameful incident in Nagpur)

सुप्रिया सुळे संतापल्या

महिलेला भररस्त्यात मारहाण झाल्याने खासदार सुप्रिया सुळे या संतापल्या. महिला सुरक्षित आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

काय संपूर्ण प्रकरण?

आरोपी कार चालकाचं नाव शिवशंकर श्रीवास्तव असं आहे. आरोपी कारचालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. दरम्यान, मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओव्हरटेक केले. महिला पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीतून खाली उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली. दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला.

रायगड : राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांची पंचायतीच्या आवारात महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये चाललंय काय?

यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे भांडण सोडवलं. तर काहींनी हा प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आणि वायरल केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार वायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये चाललंय काय? असा सवाल लोक उपस्थित करीत आहेत.

Crime: Instagram वरील मित्राने महिलेला विकलं; जबरदस्तीने लग्न, लैंगिक अत्याचार

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?