Aryan Khan: शाहरुखच्या मुलाला तुरुंगात पाठवणारे समीर वानखेडेच अडकले CBI च्या जाळ्यात - Mumbai Tak - cbi registers corruption case against irs officer sameer wankhede cbi team searching their premises in mumbai - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Aryan Khan: शाहरुखच्या मुलाला तुरुंगात पाठवणारे समीर वानखेडेच अडकले CBI च्या जाळ्यात

Aryan Khan Drug Case: सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला असून त्यांच्या मुंबईतील घर आणि संबंधित ठिकाणी झाडाझडती सुरू केली आहे.
Updated At: May 12, 2023 20:28 PM
aryan khan drug case cbi registers corruption case against irs officer sameer wankhede

Sameer Wankhede: मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. कारण केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नव्हे तर सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराचीही झडतीही घेतली आहे. 2021 मध्ये समीर वानखेडे हे ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनीच ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली होती. या सगळ्या मुद्द्यावरुन माजी मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात आधी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (cbi registers corruption case against irs officer sameer wankhede cbi team searching their premises in mumbai)

सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील घरी आणि संबंधित ठिकाणी छापे मारुन झडती देखील घेण्यात आली आहे. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (मुंबई झोन) चे प्रमुख होते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.

समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा का दाखल झाला?

समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी एक व्हिजिलन्स टीम तयार करण्यात आली होती. प्रभाकर साईल हा जो साक्षीदार होता त्याने असा आरोप केला होता की, समीर वानखेडे याने 25 कोटींची लाच घेतलेली आहे. याच आरोपांनंतर व्हिजिलन्स टीम तयार करण्यात आली होती. त्यासंदर्भात चौकशीही सुरू झाली होती. ज्यानंतर आर्यन खान प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडून काढून घेतला होता.

हे ही वाचा >> पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!

व्हिजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी या संदर्भात जो रिपोर्ट तयार केला त्यात त्यांनी दावे केले आहेत की, भ्रष्टाचाराचं कलम त्यांच्याविरोधात लावण्यात यावे. कारण काही संशयास्पद गोष्टी यात आढळून येत आहेत. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे अधिक संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ज्यानंतर सीबीआयने FIR दाखल करू नये अशी मागणी वानखेडेंनी कोर्टाकडे केली होती. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.

हा रिपोर्ट जेव्हा तयार झाला त्यानंतर सीबीआयने आता वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केला. ज्यानंतर वानखेडेंशी संबंधित ज्या मालमत्ता आहेत तिथे छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे.

नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, लोकांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा काम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी करतात असा थेट आरोप केलेला.

त्यानंतर कॉर्डेलिया ड्रग्स प्रकरणातील एक-एक पंच हे जेव्हा पुढे येऊन वानखेडेंवर आरोप करू लागले तेव्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली की, या प्रकरणात काही तरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर सिंह यांना मुंबईत पाठवलं.

त्यानंतर समीर वानखेडे यांची व्हिजिलन्स चौकशी ही सुरू झाली. नंतर चौकशीतून असं समोर आलं की, वानखेडे हे गुन्ह्यांमधील चौकशी योग्य पद्धतीने करत नाहीत. अशा गोष्टी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. याच रिपोर्टनंतर आयकर विभागाने याबद्दल कारवाई सुरू केली होती.

नवाब मलिकांनीही केले होते वानखेडेंवर गंभीर आरोप

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. समीर वानखेडे हे लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळत असल्याचे आरोप मलिकांनी केलेले. तसेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने शासकीय नोकरी मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय समीर वानखेडे यांनी वय लपवून बारचा परवाना घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ज्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.

हे ही वाचा >> मुलासह विमानातून बंगळुरूला येत होती महिला, पण…; मृतदेहच उतरवला

समीर वानखेडे एनसीबीमध्ये असताना त्यांनी शाहरुख खानच्या मुलाविरुद्ध ड्रग्ज प्रकरणाचा तपास केला होता. त्यावेळी ते एनसीबी मुंबई झोनचे प्रमुख होते. न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला आणि तसेच या संपूर्ण प्रकरणात त्याला क्लीन चीट देखील दिली.

Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान! अल्लू अर्जुनने केलं मतदान, ज्युनियर NTR ने लावली रांग; तेलंगणा मतदानात स्टार पॉवर!