पुणे: वहिनीसोबत दिराचे अनैतिक संबंध! जंगलात घडलं भलतंच... छोट्या भावाने मोठ्या भावाला संपवलं!

मुंबई तक

Pune Shocking Viral News :  पुण्याच्या चरहोली परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या मोठ्या भावाचा खून करण्यात आला.

ADVERTISEMENT

Extra Marital Affaire Shocking News
Extra Marital Affaire Shocking News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खळबळजनक घटनेमुळं पुणे हादरलं!

point

छोट्या भावाने मोठ्या भावाची केली निर्घृण हत्या

point

त्या घरात नेमकं घडलं तरी काय?

Pune Shocking Viral News :  पुण्याच्या चरहोली परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या मोठ्या भावाचा खून करण्यात आला. छोट्या भावाने वहिनीसोबत मिळून मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनू लकडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर धनू दादा लकडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ धनु दादा लकडेचा छोटा भाऊ आहे. तर धनू दादा मोठा भाऊ असल्याने कुटंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. 19 वर्षीय सोमनाथचे त्याच्या वहिणीसोबत अनैतिक संबंध होते. तो सर्व जण एकाच घरात राहत होते. त्यामुळे ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.

त्या तिघांमध्ये नेहमीच व्हायचं भांडण..एक दिवस घडलं भयंकर!

एक दिवस धनूला या अफेअरबाबत कळलं. त्याने त्याची पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांच्यात हाणामारी झाली. धनू त्याची पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथसोबत हाणामारी करायचा. हे प्रकरण सोडवण्यासाठी कुटुंबाची बैठक झाली. पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. अखेर शीतल आणि सोमनाथने त्याचा भाऊ धनूला कायमचं वेगळं करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? रेल्वे विभागाचा मोठा निर्णय...

शनिवारी दोघे भाऊ बकऱ्यांना शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडले. सोमनाथ हत्येच्या तयारीत होता. धनूला जराही संशय आला नाही की, सोमनाथ त्याची हत्या करणार आहे. सोमनाथने त्याच्या भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या धनूचा मृत्यू झाला. धनूची हत्या केल्यानंतर आरोपी सोमनाथ त्याठिकाणाहून फरार झाला आणि धनू बेपत्ता असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी या हत्याप्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी लोकांकडे विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सोमनाथ आरोपी असल्याचं पोलिसांना कळलं. वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याने भावाचा खून केल्याचं सोमनाथने कबूल केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोमनाथ आणि शीतलला अटक केली आहे. दिघी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. क्राईम पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा >> कॉलेजच्या विद्यार्थीनीने बाळाला दिला जन्म! नराधमाने लैंगिक शोषण केलं अन् नंतर..पीडितेनं पोलिसांना सगळंच सांगितलं!

हे वाचलं का?

    follow whatsapp