21 वर्षाच्या तरूणाने केली जबरदस्ती, कॉलेज तरूणी गरोदर.. बाळालाही दिला जन्म!
Todays Shocking Viral News : कर्नाटकमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे. येथील एका कॉलेजच्या विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत लैंगिक शोषण

विद्यार्थीनी झाली गर्भवती

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Todays Shocking Viral News : कर्नाटकमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे. येथील एका कॉलेजच्या विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला आहे. ती मंगलुरुमध्ये शिक्षण घेत होती. परंतु, या विद्यार्थीनीसोबत जे घडलं, ते उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. हे धक्कादायक प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका शहरात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी म्हटलंय की, लैंगिक शोषण केल्यानंतर विद्यार्थीनी गर्भवती झाली. कृष्णा जे राव (21) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मैसूर जिल्ह्यातील के टी नरसीपुरा येथून आरोपीला अटक करण्यात आली. तसच तपासासाठी आरोपीला मंगळुरुत आणण्यात आलं. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
नेमकं घडलं तरी काय?
मंगळुरुत शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थीनीने एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. स्थानिक लोक, सामाजिक संघटना आणि नेत्यांनी निषेध व्यक्त केला. पीडित विद्यार्थीनीने बाप्पालीग येथील रहिवासी कृष्ण दे रावच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
हे ही वाचा >> व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मीरा रोडवर मराठी माणूस पेटून उठलां
त्या ठिकाणीही विद्यार्थीनीची काढली छेड
कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जस्टिस रानडे शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली होती. सहाय्यक शिक्षक निसार मुल्लानं एका विद्यार्थीनीची छेड काढल्याची घटना घडली होती. ही धक्कादायक घटना 2 जुलै 2025 रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुल्लाला चांगलाच चोप दिला आणि त्याला मुरगुड पोलिसांच्या ताब्यात दिलं. शाळा प्रशासनाने तातडीने कारवाई करत मुल्लाला नोकरीवरून काढून केलं. पोलिसांनी मुल्लाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निसार मुल्ला बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थीनीची छेड काढत होता.