व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मीरा रोडवर मराठी माणूस पेटून उठला
Marathi Morcha : मुंबईतील मीरा भायंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मराठी आंदोलकांना मोर्चा काढण्यास विरोध केला आहे. एवढंच नाही,तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मीरा भायंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आंदोलनास विरोध

हजारो मराठी लोक रस्त्यावर

मनसेचे नेते अटकेत
Marathi Morcha : मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती आणि मराठी बांधवांना मोर्चा काढण्यास सरकारने विरोध केला. एवढंच नाही,तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तसेच अविनाश जाधव यांना पहाटे 2 : 45 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तसेच काही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आंदोलन न करण्याबाबत सरकारने नोटीसा पाठवल्या होत्या. यावर आंदोलकांनी 'व्यापाऱ्यांचा मोर्चा चालतो पण मराठी माणसाच्या मोर्चाला विरोध का केला जातो'? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासाठी हजारो मराठी लोक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती पाहता वातावरण चांगलंच तापलेलं दिसून आलं होतं.
हेही वाचा : परिसीमेचा कळस! चॉकलेट बिस्किटांचं लहान मुलीला दाखवलं आमिष, मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओज् दाखवून...नको तेच
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
मुंबईतील मीर भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. मात्र, मराठी माणूस 8 जुलै रोजी मंगळवारी मोर्चा काढण्यास रस्त्यावर उतरल्याने सरकारने पोलिसांच्या मदतीने निष्पाप लोकांना ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही,तर ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं आहे.
मराठी माणूस पेटून उठला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र मराठी एकीकरण समिती, मनसे आणि उबाठाने याला कडाडून विरोध केला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या एका दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीबाबतचा जीआर रद्द केला. त्यानंतर विजयी मेळावा साजरा करण्यासाठी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यसपीठावर आले. त्यानंतर आता सरकारने या आंदोलनाला नकार दिला.
हेही वाचा : आरसीबीचा क्रिकेटपटू अडचणीच्या भोवऱ्यात, तरुणीने शरीरसंबंधाचा आरोप करत...पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल?
मराठी माणसाला आंदोलन का करू देत नाही?
त्यानंतर आता मराठी माणूस मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, सरकार मराठी माणसाला आंदोलन का करू देत नाही? असा सवाल आता अनेक मनसे नेत्यांनी केला आहे. मनसेचे कार्यकर्ते गजानन काळे यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषा बोलता येत नसेल तर ती शिका आणि मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा, असे आंदोलकांचे आणि मराठी जणांचं म्हणणं आहे.