Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल - Mumbai Tak
Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल

friendship on instagram cost the police woman dearly the young man sexually assaulted her by luring her for marriage

Kalyan Crime: कल्याण: एका 30 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत (Police Woman) एक अत्यंत खळबळजनक घटना ही कल्याण पूर्वेत घडली आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनोळखी तरुणाशी मैत्री करणं या महिलेला फारच महागात पडलं आहे. कारण याच तरूणाने महिला कॉन्स्टेबलचं शारीरिक शोषण केल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. (friendship on instagram cost the police woman dearly the young man sexually assaulted her by luring her for marriage)

मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कॉन्स्टेबलची इंस्टाग्रामवर 27 वर्षीय मुलाशी मैत्री झाली होती. त्यानंतर एके दिवशी बहाणा करून तो महिला कॉन्स्टेबलच्या घरी आला. यावेळी त्याने कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून महिला कॉन्स्टेबलला बेशुद्ध केलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर आरोपी तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून महिला कॉन्स्टेबलशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर त्याने महिला कॉन्स्टेबलसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलच्या फिर्यादीवरून 27 वर्षीय आरोपीविरुद्ध कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कलम 376, 328 आणि अनुसूचित जाती जमाती कलम 3 (2) अ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश जयधर घुले असे आरोपीचे नाव आहे.

महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत नेमके काय-काय आरोप केले?

साधारण दीड वर्षापूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून माझी ओळख आकाश जयधर घुले, वय अंदाजे 27 ते 28 वर्षे याचे बरोबर झाली. तेव्हा त्याने मला तो आर्मीमध्ये असल्याचे सांगुन सध्या तो बॉम्बे इंजिनीयर ग्रुप, खडकी, पुणे येथे डी.आय प्रशिक्षक म्हणून नियुक्तीस असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आकाश व माझे एकमेकांसोबत फोनवर बोलणे व मेसेज करणे चालू झाले व आमचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांनतर त्याने मला एकदा फोन करून माझी जात कोणती? असं विचारलं. तेव्हा मी त्याला माझी जात सांगितली. त्यानंतर आकाश याने एकदा फोनवर मला तुला प्रत्यक्ष पहायचे आहे व मी तुला कल्याण येथे भेटण्यास येणार आहे. असे बोलुन त्यांनतर दिनांक 8/5/2022 रोजी तो मला माझे कल्याण येथील माझ्या रूमवर भेटण्यास आला.

त्यानंतर तो माझे रूमवर दोन ते तीन दिवस मुक्कामास राहिला होता व त्यांनंतर तो त्याचे मुळगावी निघून गेला होता. काही दिवसांनी परत तीन ते चार महिन्यांनी आकाश हा माझ्या कल्याण येथील रूमवर येऊन साधारण आठ दिवस माझ्यासोबत कल्याण येथील घरी मुक्कामास राहिला. त्यावेळेस एक दिवशी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्याने मला एक थंड पेय प्यायला दिले व काही वेळातच मला गुंगी आल्यासारखे झाले.

हे ही वाचा >> ‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’, गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसे काय बोलले?

त्याचा फायदा घेऊन त्याने माझ्याशी माझ्या इच्छेविरूदध जबरदस्तीने लैंगिक संभोग केला. मी त्याला तु माझे आयुष्य का खराब केलेस? अशी विचारणा केली असता त्याने मला तू घाबरू नकोस मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. असे बोलल्यानंतर मी त्याचे बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत गेले. मी त्याच्या आमिषाला बळी पडत गेले. यावेळी मी नाईलाजाने त्याचे ऐकत असे व तो जे-जे बोलेल ते-ते करत असे.

दरम्यान दिनांक 12/05/2023 रोजी मला आकाशचा चुलत भाऊ राजेश घुले याने फोन करून आकाशने मुलगी बघितली आहे व तो आता लग्न करणार असल्याचे सांगितले. सदरची गोष्ट ऐकून मी लगेच आकाशला फोन केला व खात्री केली असता तो बोलला की, असे काही नाही, मला समोरूनच मुलींचे प्रपोजल येत आहेत मी एकही मुलगी बघायला गेलो नाही.

पण यावेळी मी थेट त्याच्या मूळगावी त्याला भेटण्यासाठी गेले. मी त्याला त्याच्या आई-वडिलांना भेटायचे आहे असे बोलले असता त्याने नकार दिला व तो तेथून निघून गेला. त्यानंतर मी त्याचे केळगावात चौकात गेले व पोलीस कंट्रोलला फोन करून पोलीस मदत मागितली असता, सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आले. त्यानंतर काही वेळातच आकाश व त्याचे वडील जयधर घुले हे सदर ठिकाणी आले. त्यावेळेस मी आकाशचे वडिलांना सर्व हकीकत सांगितली व मला त्याचेशी लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर आकाशने त्याला हे जमणार नाही, दोघांची जात वेगळी आहे असं सांगितलं.

त्यानंतर केज पोलीस ठाण्यात मी व आकाश व त्याचे नातेवाईक असे गेलो असता तेथील पोलीस निरिक्षक पवार यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व माझ्यासमोर आकाशला माझ्याशी लग्न करणार की नाही असे विचारले. त्यावेळी त्याने पोलिसांच्या भीतीने त्यांच्यासमोर माझ्याशी लग्न करण्यास होकार दिला.

हे ही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!

दरम्यान, त्यानंतर आम्ही आकाशचे वडील व गावातील काही लोक असे आकाशच्या घराच्या बाहेर एकत्र जमलो व आम्ही सर्वजण तेथे बैठकीकरता बसलो. बैठकीमध्ये चर्चा झाल्यांनतर आकाशने मला सांगितले की, माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नास विरोध आहे. कारण तू खालच्या जातीची आहेस म्हणुन मी तुझाशी लग्न करू शकत नाही.

असे आरोप महिला कॉन्स्टेबलने केले आहेत. तसेच आरोपी तरुणावर तिने कारवाईची मागणी देखील केली आहे. आता याप्रकरणी पोलीस नेमकी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo