साखरपुडा झाला अन् उतावळा नवरा गेला होणाऱ्या बायकोकडे, रात्री नको तेच घडलं ना राव!
Crime news : नवऱ्या मुलाने तरुणीशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या अशा कृत्याने पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

होणाऱ्या पतीने तरुणीशी शरीरसंबंध ठेवण्याचा केला प्रयत्न

कुटुंबियांनी केला संताप व्यक्त
Crime news : राजस्थानातील अलवरमध्ये विवाहापूर्वीच नवऱ्या मुलाने तरुणीशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तरुणाच्या या कृत्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीचं घर गाठलं आणि जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले होते. तरुणीच्या कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती मिळताच, कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ही घटना 23 जून रोजी घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : भयंकर! डॉक्टरने नवजात अर्भकाला केलं मृत घोषित, कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची केली तयारी अन् बाळ लागलं रडू
संबंधित प्रकरण हे आदर्शनगर पोलीस ठाणे येथील आहे. पोलिसांनी सांगितलं की, अटकेत असलेल्या तरुणावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलेला आहे. जेव्हा तरुणाने हे कृत्य केलं होतं तेव्हा तरुणीच्या घरी कोणीही नव्हतं. काही वेळानंतर पीडित तरुणीचे कुटुंबिय घरी परतले असता, ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी सांगितलं की, ही घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. पीडित तरुणीचा काही दिवसांपूर्वीच तरुणासोबत साखरपुडा झाला होता. कुटुंबियाचं म्हणणं होतं की, तरुणी लवकरच पौढ होईल, त्यानंतर तिचा विवाह करण्यात येईल. याचदरम्यान, तरुणी आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोनवर बोलायची. दोघांना एकमेकांच्या कुटुंबियांबाबत माहिती होती.
हेही वाचा : Viral Video: 'पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध', गावकऱ्यांनी पुतण्या आणि काकूसोबत केलं भलतंच!
23 जून दिवशी दुपारी कुटुंबातील लोक हे शेतात गेले होते. त्याचवेळी तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने तिचं घर गाठलं. त्यानंतर तरुणीचे कुटुंबीय घरी परतले असता, तरुण तिथून पळून गेला. त्यानंतर या घटनेची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना कळाल्यानंतर, त्यांनी तरुणाच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.