पत्नी OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, मागून आला पती.. महिलेने 'त्या' अवस्थेतच काढला पळ, Video प्रचंड व्हायरल!

मुंबई तक

एक विवाहित महिला ही OYO मध्ये तिच्या प्रियकरासोबत गेली होती. यावेळी दोघांचा रोमान्स सुरू असताना अचानक महिलेचा पतीच हॉटेलमध्ये पोहचला. ज्यानंतर महिलेने हॉटेलमधील गॅलरीतून पळ काढला. ज्याचा व्हिडिओ हा आता व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

पत्नी OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, मागून आली पती (Viral Video Grab)
पत्नी OYO हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, मागून आली पती (Viral Video Grab)
social share
google news

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठमधून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत OYO हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत होती. पण त्यानंतर जे घडलं त्याचा त्या महिलेने देखील कधी विचारही केला नसेल. त्याचं झालं असं की, महिला बॉयफ्रेंडसोबत ऐन रंगात आलेली असतानाच अचानक OYO हॉटेलच्या त्या रुममध्ये थेट तिचा पतीच पोहोचला. पण त्यावेळी तो एकटा नव्हता. तर सोबत त्यांच्या मुलांना देखील घेऊन आलेला.

या संपूर्ण घटनेनंतर जे घडले ते चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. हे संपूर्ण प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा>> घरमालकासोबत सुरू होते महिलेचे शरीर संबंध, पतीने रंगेहाथ पकडलं; पत्नी म्हणाली, 'जे सुरू आहे ते गुपचूप पाहा नाहीतर...'

OYO हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

महिला हॉटेलच्या एका खोलीत तिच्या प्रियकरासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. त्यानंतर दोघांचा रोमान्स देखील सुरू झालेला. पण तेव्हाच अचानक महिलेचा पती मुलांसह हॉटेलमध्ये पोहोचला आणि तो थेट खोलीत शिरला. जिथे पत्नीचे परपुरुषासोबत अश्लील चाळे सुरू होते. जे पाहून पती प्रचंड संतापला आणि त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण अधिकच टोकाला पोहचलं. यावेळी बॉयफ्रेंड आणि महिलेने पतीला हॉटेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पती प्रचंड संतापलेला असल्याने तो बाहेर निघण्याऐवजी अधिकच गोंधळ घातला.

Viral Video Grab

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या सगळ्या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला हॉटेलमधील गॅलरीतून पळून जाताना दिसत आहे. ज्यामध्ये महिलेची अवस्था आक्षेपार्ह आहे. कारण ती थेट साडी हातात घेऊनच खाली पळ काढत असल्याचं दिसतं आहे.

हे ही वाचा>> न्यूड केलं अन् 'ओरल सेक्स' करायला लावलं, Video केला शूट; मुंबईतील धक्कादायक घटना

दरम्यान, संतप्त झालेल्या पतीने महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण हाताळलं. सुरुवातीला पोलिसांनी पतीला तसेच महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलीस ठाण्यात बोलावलं. जिथे त्यांची चौकशी करण्यात आली.

संपूर्ण घटना काय?

पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण ही पतीला लागली होती. त्यामुळेच पत्नीच्या हालचालींवर त्याने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याला समजलं की, त्याची पत्नी ही प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये जाणार आहे. ज्यानंतर पतीने त्या दोघांचा पाठलाग केला. पण हॉटेलमध्ये तो एकटाच गेला नाही. तर आपल्या दोन मुलांना देखील सोबत घेऊन गेला. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला धमकीही दिल्याचा आता आरोप करण्यात येत आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

पतीचा रुद्रावतार पाहून पत्नीने आणि तिच्या प्रियकराला ही गोष्ट कळून चुकली की,  परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. परंतु प्रकरण अधिकच चिघळू नये यासाठी हॉटेलमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनेनंतर, पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि म्हटले की त्याच्या पत्नीने त्याची फसवणूक केली आहे. दरम्यान, आता पती मुलांसह दुसरीकडे राहण्यासाठी गेला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp