Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / सिद्धू मुसेवाला हत्या : करण जोहरही होता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर; महाकाळची धक्कादायक माहिती
गुन्ह्यांची दुनिया बॉलिवूड

सिद्धू मुसेवाला हत्या : करण जोहरही होता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर; महाकाळची धक्कादायक माहिती

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत खळबळजनक दावा केलाय. चित्रपट दिग्दर्शक करण जोहर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता, असा दावा सौरभ महाकाळने आपल्या चौकशीत केला आहे. त्यांच्या या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आलेली नाही.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली. त्याच्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये पोलिसांना काही जणांवर संशय असून, त्यात पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता. दोघेही २०२१ पासून फरार होते. संतोष जाधव याने राण्या बाणखेले याची हत्या केली होती. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता.

अखेर त्याला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तर सौरभ महाकाळ याला मकोका गुन्ह्यातील आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेली आहे.

Sidhu Moose wala Murder Case : संतोष जाधवचं नवं कनेक्शन, माहितीने पुणे पोलिसांची उडवली झोप

पोलिसांनी सौरभ महाकाळची चौकशी केली. या चौकशीत त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता. करण जोहरकडून ५ कोटींची खंडणी उकळण्याचा प्लान होता,” असं त्याने चौकशीत सांगितलं. मात्र, सौरभ महाकाळ हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी महाकाळची चौकशी केली होती. त्यावेळी त्याने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीमागे लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याचं सांगितलं होतं. राजस्थानातील तीन लोक यामागे असून, ते पालघरमधील एका फॅक्टरीत कामाला आहेत. धमकीचं पत्र देण्यासाठी ते मुंबईत आले होते, असं सौरभ महाकाळने चौकशीत म्हटलं होतं.

सौरभ महाकाळने दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी पालघरमधील त्या फॅक्टरीला भेट दिली. तिथे केलेल्या चौकशीत कथित लोक तिथे काम करत नसल्याचं चौकशीतून निष्पन्न झालं. सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे ज्या तीन लोकांची नावं महाकाळने सांगितली होती, त्या तिघांनाही अटक झालेली असल्याचं समोर आलं.

आईने डोळ्यासमोर घेतलं होतं पेटवून; सिद्धेश कांबळे सौरभ महाकाळ कसा बनला?

राजस्थानातील सिरोही येथे ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा टाकल्याप्रकरणी ५ जून रोजी अटक केलेलं असल्याचं पोलिसांना तपास आढळून आलं. ते तिघेही सध्या तुरुंगात आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे सौरभ महाकाळकडून दिल्या जाणाऱ्या माहिती विश्वासार्ह नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

मुंबई पोलिसांनी केली होती सौरभ महाकाळची चौकशी

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरातील असलेल्या सौरभ महाकाळला पुणे ग्रामीण पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली होती. त्याने राण्या बाणखेले हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधवला आश्रय दिल्याचा आरोप आहे. सौरभ महाकाळला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाकाळची चौकशी केली होती. त्यात त्याने सलमान खानला आलेल्या धमकीमागे लॉरेन्स बिश्नोई असल्याचा दावा केला होता.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 2 =

राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री