Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Sidhu Moose Wala Case: वेश बदलून गुंगारा देणाऱ्या संतोष जाधवचा ठिकाणा पोलिसांनी कसा शोधला?
गुन्ह्यांची दुनिया

Sidhu Moose Wala Case: वेश बदलून गुंगारा देणाऱ्या संतोष जाधवचा ठिकाणा पोलिसांनी कसा शोधला?

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं. वर्षभरापासून मागावर असलेल्या पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक केली. सतोष जाधवला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, पोलिसांनी अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा तपास करत असताना इतर जणांबरोबर पुण्यातील सौरभ ऊर्फ महाकाल आणि संतोष जाधव यांच्यावर पोलिसांना संशय आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांची ओळख पटवल्यानंतर शोधाला गती दिली.

मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? काय म्हणाल्या आशा गवळी?

महत्त्वाचं म्हणजे संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता. ओंकार ऊर्फ राण्या बानखेले खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु. रजि. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२, १२०(ब) ३४ शस्त्र अधिनियम कलम ३, २५. २७. सह मोक्का कलम ३(१)(ii), ३(४)) दाखल आहे.

संतोष सुनील जाधव याने त्याच्या साथीदारांसह ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याचा गोळ्या घालून खून केला होता. संतोष जाधव हा विविध राज्यात सतत फिरत असल्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, ७ जून २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संतोष जाधवला आश्रय देणाऱ्या सौरभ ऊर्फ सिद्धेश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे यास अटक केली.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठे यश; सौरभ महाकाळला अटक

सौरभ ऊर्फ महाकाल याची पोलिसांनी चौकशी केली. त्याने संतोष जाधवबद्दल पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. सौरभ ऊर्फ सिद्धेश ऊर्फ महाकाल याने पोलिसांना सांगितलं की, संतोष सुनील जाधव हा त्याचा मित्र नवनाथ सुरेश सुर्यवंशी (रा. स्वामी नारायण नंदीराचे समोर मांडवी, ता मांडवी, जि. भूज, गुजरात) यांच्याकडे राहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचं पथक तत्काळ गुजरातमधील मांडवी गेलं. पोलिसांनी सावधगिरी बाळगत कारवाई केली. पोलिसांनी प्रथम नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे संतोष जाधवबद्दल चौकशी केली. त्याने सुरवातीला माहिती नसल्याचं सांगितलं, मात्र पोलिसांनी खाकी दम भरताच त्याने संतोष जाधवचा ठिकाणा सांगितला.

संतोष जाधव हा गुजरातमधीलच मांडवी तालुक्यात असलेल्या नागोर येथे ओळखीच्या ठिकाणी ठेवल्याची माहिती दिली. त्याच्या जेवणाची व राहण्याची सोय केली असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. त्याला स्वतःचं सिमकार्ड वापरण्यास दिल्याची माहिती नवनाथने दिली.

ठिकाणाची खात्री झाल्यानंतर पोलीस नागोर (ता मांडवी, जि. भुज, गुजरात) येथे गेलं आणि संतोष जाधवला अटक केली.

ओळख लवपण्यासाठी वेश बदलला

फरार झाल्यानंतर संतोष जाधव याने त्याची ओळख लपवण्याकरीता टक्कल केलं होतं. स्वतःचा संपुर्ण पेहराव बदलेला होता. दरम्यान मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी नवनाथ सूर्यवंशी यालाही अटक केली.

संतोष जाधववर असलेले गुन्हे

मुख्य आरोपी संतोष जाधव याच्याविरुद्ध पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. १) मंचर पोस्ट रजि.नं. ११८/२०१७, भादवि कलम ३०७,१२० (ब), २०९,३४, २) मंचर पो.स्टे.जि.नं. ४६३/२०२९, भादवि कलम १२०(ब), शस्त्र अधिनियम कलम ३.२५, जुवेनाईल जस्टीस अॅक्ट कलम ८३(२), ३) मंचर पो.स्टे गु. रजि. नं. १४०/२०१९, भा.दं.वि कलम ३६३ ३७६, पॉक्सो अॅक्ट फल ४,६,८.९२, ४) मंचर पो स्टे राज. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२,१२० (ब). ३४ शस्त्र अधिनियम कलम ३,२५,२७, ५) मंचर पो.स्टे. गुरजि नं १०७/२०२२, भादंवि कलम ३८४,३८५,५०६, ३४ असे गुन्हे दाखल आहेत.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री