ह्रदयद्रावक घटनेनं कल्याण हादरलं! आईची हत्या केली, आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह पंख्याला लटकावला

मुंबई तक

कल्याण पूर्व भागात एका बेरोजगार तरुणाने आईचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केल्याची ह्दयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात हनुमान नगरमध्ये एका बेरोजगार मुलाने पैशाच्या कारणावरुन आपल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात खून केला. आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कल्याण पूर्व भागात एका बेरोजगार तरुणाने आईचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केल्याची ह्दयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात हनुमान नगरमध्ये एका बेरोजगार मुलाने पैशाच्या कारणावरुन आपल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात खून केला.

आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी आरोपी मुलाने मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसेल अशा पद्धतीने पंख्याला लटकावला होता. मात्र, आरोपी मुलाचा हा बनाव पोलिसांनी तपासाअंती उघडा पाडला.

आरोपीने आईची हत्या का केली? मध्यरात्री काय घडलं?

मंगळवारी (६ सप्टेंबर) रात्री ही संपूर्ण घटना घडली. सरोजा पुमणी असे मयत महिलेचं नाव आहे. रवी पुमणी (३४, रा. प्रभुकुंज सोसायटी, मनीषा गॅस एजन्सी गोदाम जवळ, हनुमान नगर, कल्याण पूर्व) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

रवी पुमणी हा बेरोजगार आहे. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नियमित आई सरोजा हिच्याकडे बाहेर उधळपट्टी करण्यासाठी पैशाची मागणी करायचा. सतत पैसे देणं शक्य नसल्यानं सरोजा या त्याला नकार देत होत्या.

पैसे देत नसल्यामुळे रवीला राग येत होता. दरम्यान, मंगळवारी रात्री दीड वाजता आई सरोजा सोबत रवीचा किरकोळ कारणावरून आणि पैशांच्या विषयावरुन वाद झाला. सरोजा यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर रागावलेल्या रवीने आईशी भांडण उकरुन काढून तिला बेदम मारहाण केली आणि रागाच्या भरात आईला जमिनीवर पाडले. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला. यात सरोजा यांचा जागीच मृत्यू झाला.

कल्याण : पोलिसांनी चौकशी केली आणि रवीने दिली कबुली

आईचा खून केल्यानंतर हे प्रकरण अंगलट येईल या भीतीने रवीने आईने गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव रचला. त्याने आईचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने घरातील पंख्याला लटकवला. शेजाऱ्यांना आपण घरात आपल्या खोलीत झोपलो असताना आईने गळफास घेतल्याचं सांगितलं.

दरम्यान याबाबतची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रवीची पार्श्वभूमी तपासली आणि त्याची सखोल चौकशी केली. या चौकशीत त्याने आपण आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्या तक्रारीवरुन रवी पुमणी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई तपास सुरु केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp