भावाच्या मेव्हणीला जंगलात नेलं आणि तिच्यावर केला रेप, तेवढ्यात आले तीन तरूण; त्यांनी तर...
Gangrape Crime News : उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने त्याच्याच भावाच्या मेव्हणीवर जंगलात बलात्कार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नराधमांनी जंगलात तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

व्हिडीओ काढून पीडितेला केलं ब्लॅकमेल

पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Gangrape Crime News : उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने त्याच्याच भावाच्या मेव्हणीवर जंगलात बलात्कार केला. तेव्हा तिथे तीन मुलं आली. त्या नराधमांनीही तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केला. त्यांनी पुन्हा तरुणीला भेटायला बोलावलं. पण तरुणीने घडलेला धक्कादायक प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं. याप्रकरणी चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक झाली आहे. पोलीस इतर तीन आरोपींचा शोध घेत आहेत.
ही धक्कादायक घटना बिनावर परिसरातील एका गावात घडली. पीडित तरुणीची मेडिकल टेस्ट करण्यात आली. करण नावाच्या तरुणाची त्याच्या भावाच्या मेव्हणीवर वाईट नजर होती. तो तिला फूस लावून जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीने विरोध केल्यावर तिला मारहाण केली. तेव्हा तिथे विजयनगला गावातील रविंद्र,सोनू आणि एक अज्ञात तरुणही पोहोचला. त्यांनी तरुणीला ब्लॅकमेल करत तिच्यावर गँगरेप केला.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
तिचा व्हिडीओही बनवला. पीडित तरुणी कशीबशी नराधमांच्या तावडीतून सुटली अन् ती घरी गेली. भीतीपोटी तिने घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितलं नाही. घटनेनंतर करण त्याच्या गावी आला. विजय नगलाच्या तरुणाने पीडितेला 25 जुलै रोजी पुन्हा ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर दबाव टाकला. त्याने पीडितेला धमकी दिली की, तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल.
पीडितेनं वडिलांना सांगितली आपबीती
पीडित तरुणीने रडत रडत या संतापजनक घटनेची माहिती तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडिलांनी तरुणीला पोलीस स्टेशनला नेलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीची मेडिकल टेस्ट करण्यात आली. पोलिसांना सांगितलं की, एका आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली जात आहे. पोलीस अन्य तीन आरोपींचा शोध घेत आहेत.