मार्क्स देतो असं सांगत शिक्षक विद्यार्थिनीलाच घरी बोलवायचा, नंतर विद्यार्थिनीच झाली प्रेग्नंट, हादरून टाकणारी घटना
Crime News : शिक्षकाने शाळेत नापास करेल अशी भिती दाखवून विद्यार्थिनीवर अनेकदा लैंगिक शोषण केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Crime News : ओडिशातील जाजपुर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका शालेय विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने लैंगिक शोषण केलं आहे. जर असं केलं नाही, तर तुला नापास करेल अशी धमकी दिली होती. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेग्नंट केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या अशा घटनेनं ओडिशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणाची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
ओडिशात गेली काही दिवस लैंगिक शोषणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितलं की, दोन्हीही विद्यार्थिनी या अल्पवयीन असून कंधमाल जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या वसतिगृहात राहत होत्या.
याचदरम्यान एका विद्यार्थिनीसोबतच एक भयानक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिचं म्हणणं आहे की, शिक्षकाने तिला तिच्या घरी बोलावले आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. जर शरीरसंबंध ठेऊन दिला नाहीस तर मी परीक्षेत मार्क्स कमी देईल, अशी धमकी देत ब्लॅकमेल केलं. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : तरुणी रुग्णालयात उपचारासाठी गेली, कर्मचाऱ्यानं दिलं भुलीचं इंजेक्शन, नंतर रात्रभर...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विभागप्रमुखांवर गंभीर आरोप केला आहे. तक्रारीनुसार, शिक्षकाने अनेकदा घरी शिकवणीच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक शोषण केलं. जर शरीर सुख न दिल्यास परीक्षेत नापास करेल, अशी धमकी देऊन शरीर संबंध ठेवले, या घटनेनं आता महाविद्यालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.