विद्यार्थ्याने शिक्षकाला घरी बोलावलं आणि खोलीत नेऊन केलं भलतंच काही...

मुंबई तक

दिल्लीमध्ये एका शिक्षकाला होम ट्यूशनच्या बहाण्याने घरी बोलवून त्याला फसवून जबदरस्तीने त्याचा अश्लील व्हिडीओ करण्यात आला. यानंतर पीडित व्यक्तीला व्हिडीओच्या आधारे धमकी दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

विद्यार्थ्याने शिक्षकाला घरी बोलावलं आणि खोलीत नेऊन केलं भलतंच काही
विद्यार्थ्याने शिक्षकाला घरी बोलावलं आणि खोलीत नेऊन केलं भलतंच काही
social share
google news

बातम्या हायलाइट

point

होम ट्यूशनच्या बहाण्याने शिक्षकाला घरी बोलावलं

point

शिक्षकाला घरी बोलावून जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ...

point

शिक्षकाच्या मोबईलवरुन पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न

Delhi Crime news: दिल्लीतील ज्योती नगर भागात एका शिक्षकाचं अपहरण करून अश्लील व्हिडिओ बनवून त्याला लुटल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. आरोपीने घरी ट्यूशन घेण्याच्या बहाण्याने शिक्षकाला फसवून त्याच्या बाइकवरुन घरी आणलं. घरी आल्यानंतर आरोपी तरुणाने शिक्षकाला मारहाण केली. त्याचा जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडीओची धमकी देऊन त्याला लुटल्यानंतर त्याला नाथू कॉलनी चौक फ्लायओव्हर जवळ फेकून दिले. 

आरोपी निघून गेल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. शिक्षकाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस सध्या एका सायबर कॅफे ऑपरेटरचा देखील तपास करत आहेत. पीडित व्यक्तीने आरोपीच्या पार्टनर सायबर कॅफे मालकाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख मोहित उर्फ ​​मंगल, विकास उर्फ ​​विकी, नरेश उर्फ ​​गोलू आणि शाहिद असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

होम ट्यूशनचं कारण सांगून शिक्षकाला घरी...

नंद नगरी परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पीडित व्यक्तीने तो खाजगी शाळेत शिक्षक असून ट्यूशन देखील घेत असल्याचं सांगितलं. 23 मे रोजी सकाळी 11:30 वाजता त्याला साहिलचा नावाच्या मुलाचा फोन आला. त्या मुलाने फोनवर तो 12 वीचा विद्यार्थी असून त्याला जीवशास्त्र विषयात होम ट्यूशनची गरज असल्याचं सांगितलं. शिक्षकाने आरोपीला त्याच्या घराच्या पत्त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या घराकडे जाणारा रस्ता वळणाचा आहे. तो त्याला त्याच्या बाईकवरून घेण्यासाठी येणार होता. आरोपीने शिक्षकाला त्याच्या बाईकवर बसवून त्याच्या घरी नेले. 

घरी गेल्यानंतर आरोपी दुसऱ्या खोलीत गेला आणि तो पुस्तक आणायला जातो असं सांगून नंतर त्याच्या तीन मित्रांसोबत घरी परत आला. चारही आरोपींनी आधी शिक्षकाला मारहाण केली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढायला लावून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला. आरोपींनी शिक्षकाची सोन्याची साखळी, बॅगेतील चार हजार रुपये आणि इअर बड्स लुटले.

हे ही वाचा: Mumbai: धावत्या ट्रेनमध्ये चोरी, पत्नीच्या पर्ससाठी पतीची उडी, पण चाकाखाली...

पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी पीडित पुरुषाच्या मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. परंतु टेक्निकल एररमुळे पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. यानंतर, आरोपींनी शिक्षकाचा चेहरा झाकला आणि त्याला एका ओळखीच्या सायबर कॅफे ऑपरेटरकडे नेले. तिथे त्यांनी पीडित पुरुषाच्या बोटांच्या ठशांच्या (बायोमेट्रिक) मदतीने पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक बिघाडामुळे पैसे ट्रान्सफर करता आले नाहीत. इतकेच नव्हे तर, आरोपीने चाकूचा धाक दाखवून शिक्षकाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करायला लावला, परंतु आरोपींना पैसे मिळाले नाहीत.

त्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीचा चेहरा झाकला आणि त्याला पुन्हा नाथू कॉलनी चौक फ्लायओव्हर जवळ घेऊन गेले. पीडितेची बॅग आणि मोबाईल फोन फेकून देऊन ते पळून गेले. तसेच, जर त्याने याबद्दल कोणाला सांगितले तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली.

हे ही वाचा: पतीला नव्हती आवडत सावळ्या रंगाची पत्नी, पत्नीसोबत केलं 'असं' काही की...

भावासोबत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न

कसाबसा पीडित पुरुष त्याच्या घरी पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या मोठ्या भावासोबत आरोपींना शोधण्यासाठी त्यांच्या घरी गेला. आरोपीच्या घराची खात्री केल्यानंतर, पीडितेने ताबडतोब पीसीआर कॉल केला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीसीआर आणि पोलिस क्यूआरटी टीमच्या मदतीने चारही आरोपींना अटक केली.

यानंतर, पीडित व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे, विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाची पुष्टी करण्यात आली आणि पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक देखील करण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp