रात्री अडीच वाजता उकळतं तेल पतीच्या अंगावर फेकलं, पती-पत्नीमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ही घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय इमरान अब्दुल गफ्फार शेख, जो ऑटो रिक्षा चालक आहे, याचा आपल्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाल होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने पतीच्या अंगावर उकळतं तेल फेकलं

point

किरकोळक कारणावरुन निर्माण झालेला वाद टोकाला

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून संतप्त झालेल्या पत्नीने आपल्या पतीवर खरखरीत तेल फेकल्याने पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय इमरान अब्दुल गफ्फार शेख, जो ऑटो रिक्षा चालक आहे, याचा आपल्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात पत्नीने उकळतं तेल इमरानवर फेकले. यामुळे इमरानच्या डोक्याला, चेहऱ्याला, डोळ्यांना आणि हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

हे ही वाचा >>  झुडुपांमध्ये कार, आतमध्ये तीन सडलेले मृतदेह, स्थानिक महिलेनं पाहिलं अन् हादरली... शहापूरमधील घटना काय?

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी इमरानला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु तो गंभीर जखमांशी झुंज देत आहे.

हे ही वाचा >> हनिमूनला गेलेल्या कपलसोबत काय घडलं, पतीची हत्या.. पत्नी बेपत्ता; ही मर्डर मिस्ट्री तुमचं डोकंच टाकेल चक्रावून!

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. प्राथमिक तपासात ही घटना घरगुती वादातून घडल्याचे दिसते. पुढील तपासानंतर याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp